आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह कर्ली नदीपात्रात आढळला

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह कर्ली नदीपात्रात आढळला

कुडाळ

सोनवडे तर्फ हवेली-बौद्धवाडी येथील बेपत्ता असलेले नंदकुमार विश्राम सोनवडेकर (६३) यांचा मृतदेह तेथील कर्ली नदीपात्रात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आढळला. याबाबतची खबर त्यांचा मुलगा प्रमोद सोनवडेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. नंदकुमार सोनवडेकर गेल्या दीड वर्षापासून कुणाशी जास्त काही बोलत नव्हते. ११ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता त्यांचा मुलगा प्रमोद घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आजोबा नंदकुमार हे घर सोडून जातो, असे सांगून निघून गेल्याचे सांगितले. आपण व आईने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर प्रमोद यांनी वाडीतील लोकांना घेऊन त्यांची शोधाशोध केली. तसेच सोमवारी सोनवडे गावात तसेच कुडाळ रेल्वेस्थानक, बांबुळी, बाव या गावी शोध घेतला. मात्र, ते कुठेही सापडले नाहीत. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ व पोलीस पाटील शंकर धुरी त्यांचा शोध घेत असताना तेथील बौद्धवाडी नजीकच्या कर्ली नदीपात्राच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र हुलावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील व हवालदार स्वप्नील तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाडीपात्रातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!