कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 थांबलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक

 

*🟥 अपघातात चौघे विद्यार्थी जखमी..*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१२ :-* थांबलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चौघे विद्यार्थी जखमी झाले. यातील दोघे गंभीर आहेत. हा अपघात काल रात्री साडेअकरा वाजण्याची सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडला. राहुल बोडे (रा. झाराप, विधान परमार (सावंतवाडी), सागर कदम (गोठोस), आरती नांदोस्कर (कोचरे), अशी या चौघांची नावे आहेत. त्यातील बोडे आणि परवार याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान याप्रकरणी बॉलेरो चालक लतेश रामचंद्र चुनेकर (रा.दापोली-रत्नागिरी) याच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवालदार हनुमंत धोत्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परवार व त्याचे सहकारी हम्पी – कर्नाटक येथे आपल्या ताब्यातील इनोव्हा कारने पर्यटनासाठी गेले होते. तेथून परतत असताना झाराप येथे बोडे याला सोडण्यासाठी ही गाडी महामार्गाच्या बाजूला थांबली होती. यावेळी गाडीच्या मागच्या डिकीतून बॅग काढत असताना त्या ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या बोलेरोने त्यांना धडक दिली. यात बोडे आणि परवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर बाजूला उभे असलेल्या कदम व नांदोस्कर यांना किरकोळ दुखापत झाली. तर अन्य दोघे गाडीत बसल्यामुळे सुखरूप राहिले. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी व प्रवाशांनी तात्काळ धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार अमोल महाडिक, अनंत पालव व हनुमंत धोत्रे या तिघांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चौघांना कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!