कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सव ४ फेब्रुवारीला

आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सव ४ फेब्रुवारीला

मसुरे

प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या च लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. गेल्या काही वर्षानंतर ही यात्रा यावर्षी शनिवारी आल्याने यावेळी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या यात्रा उत्सवात भराडी मातेचे दर्शन सर्व भाविकांना लवकरात लवकर होण्यासाठी आंगणेवाडी मंडळ आणि आंगणे कुटुंबियांतर्फे सुयोजित व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली.

आंगणेवाडी यात्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवितील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवीची मूर्ती ‘याची देही, याची डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांची कोणतीही गैरसोय न होता, भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.
अनेक व्यापारी,व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!