कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो आज यानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष गुंडू जाधव मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला
यावेळी गुंडू जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जयकराच्या घोषणा दिल्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिना उजाळा दिला, 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे निधन झालं होतं, त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते व तो दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीने साजरा केला जातो. यावेळी गजानन नाटेकर विश्वास घाग ,श्री बांदेकर ,श्री भोगणे, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!