कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पत्नीची पोटगी थकवाल्या प्रकरणी पतीला तुरुंगवास

पत्नीची पोटगी थकवाल्या प्रकरणी पतीला तुरुंगवास

देवगड

विवाहीत पत्नीला दरमहा दोन हजार पाचशे रुपये अंतरिम पोटगी देण्याच्या न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून १ वर्षांची पोटगी थकवल्याप्रकरणी विवाहितेचा पती संजय भानुजी आलव याला देवगडचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. वाळके यांनी १ महिना तुरुंगात
ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्यावतीने अॅ ड. वीणा लिमये व अॅड. अंजली हर्षे यांनी काम पाहिले.

याबाबत माहिती अशी की, पीडित विवाहीत महिलेने तिच्यावर शिवीगाळ मारहाण करून घरगुती हिंसाचार व छळ केल्याप्रकरणी पती संजय आलव याच्याविरुद्ध २३ जून २०२१ रोजी घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण प्रतिबंधक कायद्याखाली मे. देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मे. न्यायालयाने पीडित महिलेच्या पतीला दरमहा दोन हजार पाचशे रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र, महिलेच्या पतीने न्यायालयीन आदेशाचे पालन केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!