कोकणातील शेतकरी नाईलाजास्तव शेती करतात; माजी पं.स. सभापती सुजाता हळदीवे-राणे
▪️शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा; हळदीवे-राणे यांचे प्रतिपादन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली, दि.१०: कोकणात बदलती भौगोलिक परिस्थिती, मजुरांची वानवा, निसर्गाचा लहरीपणा, भरडापेक्षा पाण्यातील भातशेती यामुळे शेतकरी नाईलाजास्तव शेती करीत आहेत. त्याला प्रोत्साहन देऊन पुन्हा शेतीकडे फायद्यात वळविण्यासाठी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सभापती सुजाता हळदीवे-राणे यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि येथील कृषी संशोधन केंद्र व बचत गटाच्या माध्यमातून चांदा ते बांदा या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भातकापणी चे प्रात्यक्षिक दाखविताना, शेती कशी फायदेशीर होऊ शकते याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बबन हळदिवे, ग्रामविस्तार अधिकारी चौलकर, सौ. सायली तेली, विश्वनाथ जाधव, संजय भोगटे, राजन नानचे, सुनील तारळेकर, आत्माराम येरम, राजेश शिरोडकर, कृषी पर्यवेक्षक निकुंभ, तायडे, कृषी संशोधन केंद्राचे विद्यावेत्ता विजय शेटे, सहाय्यक परब, गटप्रमुख गणेश शिंदे, गांगो माऊली शेती समूहाचे अध्यक्ष संजय तेली, प्रशांत धुरी, गणेश तेली, फोंडा कृषी सहाय्यक अक्षया परब इत्यादींसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कृषी विद्यावेत्ता विजय शेटे यांनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेती यांत्रिकीकरणाद्वारे फायदेशीर करण्याचे तंत्र शेतकऱ्यांकडून करवुन घेण्यात येत आहे. भातशेती टिकविण्यासाठी हाच योग्य पर्याय आहे.
कृषी पर्यवेक्षक निकुंब म्हणाले, मनुष्यबळाच्या अभावाला यांत्रिकीकरण हा पर्याय आहे. यांत्रिकीकरणात द्वारे कमी वेळेत, कमी खर्चात जास्त काम होऊन शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो.
यावेळी गटाचे सचिव गणेश तेली यांनी यांत्रिकीकरणा द्वारे भात लावणी, भात कापणी कशी फायदेशीर आहे? हा स्वानुभव सांगताना सर्वांनी याचा आपल्या शेतीमध्ये वापर करावा, असे आवाहन केले.
शेवटी अक्षया परब यांनी आभार मानले. व भात कापणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामध्ये चांदा ते बांदा ते फूड सिक्युरिटी आर्मीच्या अक्षय नरे, प्रशांत कदम, प्रथमेश मोर्ये, विनायक पिळणकर, सखाराम हुंबे, नमिता शिरसाट, सुमित घाडीगावकर, निलेश गावकर, गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_