कनेडी आरोग्य केंद्राचे काम तात्काळ थांबवून ठेकेदाराला काळा यादीत टाका..
▪️जिल्हापरिषद बांधकाम समोर शिवसैनिक व कार्यकर्त्यांचे उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०९: जिल्हापरिषद बांधकाम समोर शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उपोषण केले. ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करत पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, महेंद्र सावंत आणि शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आले.
कनेडी आरोग्य केंद्राचे काम तात्काळ थांबवा, शिवसैनिक कार्यकर्त्यांचे उपोषण कारवाईची मागणी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण झालेले नाही. या कामाची मुदत संपून गेली तरी अर्धवट स्थितीतील कामाचे पैसे अदा करण्यात आले आहे.
याबाबत ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळा यादीत टाका, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. तालुक्यातील कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गेले काही महिने रखडले आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आले. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची होती. याला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती, असे असताना ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
त्यानंतर प्रभारी उपअभियंता श्री. सुतार यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा केली. मात्र, कार्यकारी अभियंता यांनी येथे भेट देऊन आश्वासन द्यावे कारवाई करणार किंवा नाही. हे त्यांनी सांगून या ठिकाणी भेट द्यावी. मग उपोषण मागे घेतो असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागेश मोरये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राणे, राजू शेट्ये आदींनी उपोषणात सहभाग घेतला होता. नगरसेवक कन्हैया पारकर यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

