🟥 श्री सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवासाठी गावकर मंडळी व मानकऱ्यांची लगबग
*🟥 मंदिरा भोवतालचा मंडप सजला तर मंदिराची सजावट व मंदिर विद्युत रोषणाईने झगमगले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०७:-* श्री सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवाची तयारी सद्या युद्धपातळीवर सुरु असून या तयारी अंतर्गत वाहनांसाठी आवश्यक वाहनतळ व साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आली आहे.श्री सोनुर्ली माऊलीच्या यावर्षीच्या जत्रोत्सवाची इतर तयारीही युद्धपातळीवर असून वाहनतळ,दुकाने हॉटेल्स लावण्यासाठीची व लोटांगणे घालण्यासाठी लागणारी जागा व मार्गीक तसेच परिसराची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे.देवळा भोवतालचा मंडप सजविण्यात आला असून गाभारा व देवळा भोवतालची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसरात झगमगाट करण्यात आला आहे.
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणारा हा सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर जवळ आला आहे.यासाठी सोनुर्ली व मळगांवचे गावकरी व मानकरी एकजुटीने कामाला लागले आहेत.
या वर्षी हा जत्रोत्सव नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परवा बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.आता या जत्रोत्सवास फक्त दोन उरले आहेत. या अनुषंगाने या उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणारा दोन्ही बाजूंचा मुख्य मार्ग व जोड रस्त्यांची साफसफाई तसेच वाहनतळ सुविधेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी व गावंकर ,गावातील ग्रामस्थ मंडळी जत्रोत्सवाच्या नियोजनात मग्न आहेत.
या गावकरी व मानकरी यांच्या मार्फत मंदिरा सभोवातालचा परिसर स्वच्छ व सुदंर बनविण्यात येत असून, रस्त्यांचे रुंदीकरण व शुशोभीकरण करण्यात आले आहे. या जय्यत तयारी मुळे या वर्षी भाविकांना जत्रोत्सवाचा यथासांग आनंद लुटता येणार आहे .दूर गावातून येणारे देवी भक्त व भक्त गण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा,विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा , प्रवास व्यवस्था आदी काम पूर्ण होत आहेत. यासाठी बांधकाम विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे.या जत्रोत्सवाच्या नियोजनात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये, याची दक्षता मानकरी व ग्रामस्थांनी घेतली आहे. इतकेच नव्हेतर सोनुर्ली माऊली जत्रोत्सव पूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा गतवर्षीपासून देवस्थान कमिटीने सुरु केली आहे.यावर्षीही असाच बंदोबस्त असणार आहे.याअंतर्गत पूर्ण मंदिर परिसरात देखरेख राहणार आहे. वाहनंतळाचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

