🟥 मुलांना योग्य तो पोषण आहार देऊन कुपोषणमुक्त अंगणवाड्या करणे शासनाची जबाबदारी
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०४:-* अंगणवाडीतील मुलांना योग्य तो पोषण आहार देऊन कूपोषणमुक्त अंगणवाड्या करणे हे शासनाचे काम आहे.हा आहार शिजवून आहार अंगणवाडीतील मुलांना पुरविण्याचे काम शासनाने बचतगटांवर सोपवले आहे.परंतु आहाराचे दर शासन अपूरे देते आणि बीलेही वेळेवर दिली जात नाहीत आणि ६ ते ८महीन्यांनी पैसे दिले जातात,या कारणांसाठी बहुतांश बचतगट आहाराचे काम नाकारतात.३ ते ६ वयोगटासाठी दरदिवशी,प्रत्येक मुलासाठी शासन फक्त ८रुपये देते.कूपोषित मुले व स्तनाला व गरोदर स्त्रियांसाठी १२ रुपये देतात.यात साहीत्यासह,इंधन,वाहतूक,मजूरी हा खर्च गृहीत धरला जातो.एक लाडू आणि दुपारी आहार द्यावा लागतो.कोणताही लाडू ५ रुपयांखाली मिळतच नाही.मग दूपारचा आहार द्यायला पैसे कोण देणार?
वारंवार तक्रारी करुनही कान,डोळे नसलेल्या अधिकाऱ्यांना व सरकारला ते कळत नाही असे ते ढोंग करतात.त्यामुळे या त्रासाला कंटाळून बचतगट हा आहार बनवायला तयारच होत नाहीत.पण मूले आहारापासून वंचित राहता कामा नयेत म्हणून सेविका,मदतनीस यांचेवर ही जबाबदारी अधिकारी टाकतात.घरच्या अनेक अडचणी,वेळेवर मानधन मिळत नाही ,तरीही पदरमोड करुन आमच्या अंगणवाडी कर्मचारी आहार मुलांना खाऊ घालतात.
आता आहाराचे पैसे कुडाळ प्रकल्पात आलेत,पण बचतगटांना आधी पैसे देणार नंतरचे पैसे आहार बनवणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देणार अशी आडमुठी भूमिका प्रकल्पाने घेतली आहे हे अत्यंत चूकीचे आहे असे अंगणवाडी नेत्या कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे.
एकवेळ बचतगटाकडे काही बचत शिल्लक असते,त्यातून ते आहार देऊ शकतात,पण अंगणवाडी कर्मचारी कुठून खर्च करणार?अल्प मानधनात त्यांना घर चालविणे अवघड झाले असतांना शासनाकडे ५ /५महीने बाकी ठेवणे त्यांना जमणारे नाही. लोकप्रतिनिधींनी याही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे ,पण तीव्र कूपोषित मुलांना कूपोषणाबाहेर आणण्यासाठीअंडी,केळी,बदाम,खजूर कोण देणार हे कोणीही बोलत नाहीत.
कुडाळ प्रकल्पाने भेदभाव न करता आहाराची बीले नेहमीचे पध्दतीने काढावीत ,अन्यथा सेविका,मदतनीस आहार शिजवणे बंद करतील व त्यामुळे होणाऱ्या सर्व परीणामांची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाची राहील असा इशारा कमलताई परुळेकर यांनी
दिला आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

