झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव येथे भीषण अपघात
झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव येथे भीषण अपघात
बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांच्यासहित दुसऱ्या गाडीतील प्रवाशी जखमी
सावंतवाडी (सुखदेव राऊळ )
बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के हे आपल्या ताब्यातील कारने कुडाळच्या दिशेने जात असताना कुडाळ वरुन गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुभाजाकाच्या पलीकडे येऊन त्यांच्या कारवर समोरासमोर धडकली.यामुळे झालेल्या अपघातात सोनटक्के यांच्यासह समोरील गाडीतील प्रवासीही जखमी झाले.
कोल्हापूर येथील कार चालकाला गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी लगत बांदेकर घराण्यात अपघात घडल्याची घटना घडली. या अपघाता नंतर १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. यावेळी सावंतवाडी माजी सभापती राजू परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जोशी, संजय जोशी , यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

