Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मालवण दांडी येथे दोन गटांत हाणामारी

मालवण दांडी येथे दोन गटांत हाणामारी

प्रतिनिधी -:मालवण

गाडी मागे घेण्याच्या वादातून दांडी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर गेला आठवडाभर दांडी येथे दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटना सुरू आहेत. दांडी येथील दोन्ही गटांकडून मालवण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. आहेत. याचा तपास मालवण पोलीस करत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दांडी किनारपट्टीवर पिकअप गाडी मागे घेण्यावरून दांडी येथील एका गटातील व्यक्तीने दांडी येथील दुसऱ्या गटातील व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाण करणाऱ्या दांडी येथील व्यक्तीविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर दांडी किनापट्टीवर आठवडाभर दोन्ही गटांमध्ये हाणामारीच्या घटना सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!