🟥 चिपळूण वासीयांसाठी श्री सदस्य बनले स्वच्छता दूत..
*🟥 ऐन दिवाळी सणात डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छतेचा राबविला आदर्श उपक्रम..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२८:-* डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चिपळूण वासीयांच्या मदतीला धावून आले आहे. प्रतिष्ठान ने ऐन दिवाळी सणाच्या अधल्या दिवशी सोमवार् दि. २३ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्वच्छता मोहिमेत चिपळूण वासियांसाठी स्वच्छता दूत बनून अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे,स्वच्छता मोहिमेत चिपळूण शहरातील काही विभागात अगदी नियोजनबद्ध पद्धतीने श्री सदस्य साफ सफाई करीत होते.
ऐन दिवाळी सणात दिवाळीच्या अधल्या दिवशी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्यांनी चिपळूण शहरात स्वच्छतेसाठी पुढाकार घेत विविध ठिकाणी यशस्विरीत्या स्वच्छता मोहीम राबवीली. ऑक्टोबर महिन्याचा चौथा रविवार ,डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा,अलिबाग यांचे चिपळूणमधील शेकडो श्री सदस्य सकाळी सात वाजता झाडू,घमेली, कुदळ आणि फावडी ,खुरपी,रिकामी पोती घेऊन हातात हँडग्लोझ तोंडाला मास्क लावून स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले.निमित्त होते जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभुषण डॉ. श्री. नानासाहेब तथा नारायण धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या मार्फत व पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान.या दत्तक रस्त्यांपैकी चिपळूण शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि अर्बन बँक ते भेंडी नाका असे प्रत्येकी साधारणतः चार किमीचे दोन रस्ते प्रतिष्ठानने दत्तक घेतले आहेत.यावेळी या दोन रस्त्यांवर दुतर्फा असणारा कचरा,गवत,बाटल्या,झाडी,प्लॅस्टिक हटविण्यासाठी श्री सदस्यांचे शेकडो हात सरसावले.यावेळी गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी चिपळूण नगरपालिकेने गाडीची व्यवस्था करून दिली होती.बघता बघता हे दोन्ही रस्ते स्वच्छ आणि साफ झाल्याचे दिसून आले.या रस्ते दत्तक अभियान मध्ये चिपळूण शहरातील १३१ सदस्यांनी ओला ५.६ टन आणि सुका ०.२ टन असा कचरा गोळा करून नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकण्यात आला.डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, वुक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खत निर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. त्यापैकी एक रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान घेण्याचे आले आहे.या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येणार आहेत.यावेळी नागरिकांनी प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.समर्थ बैठकीतून संपूर्ण जगाला आध्यात्मिक मार्गाने शांततेचा संदेश देणारे स्वर्गीय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पुढे सुरू असलेल्या डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी,रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात मागील वर्षी
आलेल्या पुरातही झालेल्या चिखल
दलदल,कचऱ्याचे ढीग याची साफसफाई करून मोठ्या प्रमाणात
श्री सदस्यानी हाती घेतली होती.
चिपळूण तालुक्यात दि. २२ जुलै २०२१ रोजी अचानक आलेल्या महापुरात शहर आणि अनेक गावातील नागरिकांचे मोठे हाल झाले, व्यापारी बांधवांचे झालेले अतोनात नुकसान आणि ग्रामीण भाग ,नदीलगतच्या गावांमधील शेकडो घरे उद्वस्थ झाली होती या प्रलयंकारी संकटात चिपळूण बाजारपेठेत सर्वत्र घाणीचे,
कचऱ्याचे साम्राज्य ,दुर्गंधी पसरली होती. या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. अशावेळी पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आज्ञेने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा. जि. रायगड यांच्या वतीने संपूर्ण कोकणातुन
श्री सदस्यांनी चिपळूण वासियांकरिता स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता देवदूत बनून महत्वपूर्ण योगदान दिले होते. सर्वच श्री सदस्य चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधीयुक्त साहित्य,सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली पावसाची दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसत होते.यावेळी श्री सदस्यांनी एकूण ६ टन कचरा उचलल्याने शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिक यांना मदतीचा मोठा हात मिळाला तर सर्वां अवकाळी पडलेल्या पावसामुळे
रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
चिपळूण मध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या मोहिमे बाबत चिपळूण शहरातील व्यापारी,आणि नागरिकांनी पद्मश्री डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या शिकवणी बद्दल आदर व्यक्त करून समाधान व्यक्त करीत श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांचे आभार मानले आहेत.या पूर्वीही २०१९ मध्ये सांगली,
कोल्हापूर,कोकण विभाग येथे आलेल्या महापुरात श्री सदस्यांनी मोठे स्वच्छतेचे सेवाकार्य केले होते,शिवाय केरळ येथे आलेल्या महाप्रलंयकारी पुराच्या संकटात यथोचित आर्थिक सहकार्यही करण्यात आले होते.खास मुंबई,नवी मुंबई,ठाणे येथून आलेल्या आयुक्त आणि अधिकारी वर्गाने स्वच्छता मोहिमेचे या वेळी
कौतुक केले होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
_🌱 *शिर्के ऍग्रो फार्म -गोशाळा* यांची उत्पादने वापरा आणि आपले जीवन बनवा विषमुक्त केमिकल विरहित🥦_
*🏢विषमुक्त केमिकल विरहित पंचगव्य उत्पादनांचे जिल्ह्यातील एकमेव दालन*
*🔳पंचगव्य, योगा व निसर्गोपचार मार्फत सर्व आजारांवर नाडी नाभी परीक्षण करून चिकित्सा*
_🌿🥛केवळ देशी कोकण कपिला गाईच्या गोमूत्र, गोमय, दूध, तूप आणि ताक ह्या पंचगव्य पासून तयार रोजच्या वापरातील विविध उत्पादने🧉🍯_
*◻️शेणापासून तयार झालेली उत्पादने*- 🧼दंत मंजन, धूप कांडी, गोमय साबण, चेहऱ्याला उजाळा देणारे फेसपॅक, 🧴अभ्यंगस्नान उटणे, अग्निहोत्र – पूजेसाठी लागणाऱ्या शेण्या (गोवऱ्या )
*▪️गोमूत्रपासून तयार झालेली उत्पादने*: विविध आजारांवर गुणकारी गोमूत्र अर्क, वातशामक दर्द निवारक तेल, साबण, फ्लोर क्लिनर फिनाईल, शॅम्पू, गाईच्या दुधापासून तयार केशतेल.
*देशी गाईच्या दुधापासून वैदिक पद्धतीने तयार केलेले साजूक तूप*
*🐄🐂देशी गाईच्या शेण गोमूत्रपासून खते तयार करून पिकवलेले सेंद्रिय धान्य कडधान्य, ज्वारी बाजरी गहू नाचणी इत्यादी रोजच्या आहारातील धान्य*
*🎋सेंद्रिय उसापासून तयारी नैसर्गिक काळा गूळ, गूळ पावडर, खांडसरी*
*🍚सेंधव मीठ, सेंधा नमक*
*🥜लाकडी घाण्याचे कोल्ड प्रेस तेल – शेंगदाणा तेल, तील तेल, खोबरेल तेल*
*⭕️नैसर्गिक जंगलातील शुद्ध मध*
*⭕️गोमुत्र अर्क* –
विविध प्रकारचे अर्क. तुळस, गुळवेल, कोरोना बूस्टर, अर्जुन, पारिजात, इन्सुलिन,
*👩🏼⚕️नारी संजीवनी* – महिलांच्या मासिक पाळी संधर्भातील विविध आजार, हार्मोनल इम्बॅलन्स (मासिक पाळी वेळेवर न येणे, अधिक रक्तस्त्राव, PCOS, PCOD, पोटात दुखणे, पांढरे जाणे या समस्या वर गुणकारी)
26) Bhasma भस्म -50/- पाण्यात चिमूटभर टाकून प्याल्यास शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढते.
*⭕Natural Health Products:* कोणत्याही उत्पादनात पांढरी साखर वापरलेली नाही. गूळ किवा खांडसरी वापरली आहे
मोरावळा, आवळा कँडी (गुळात मुरवून तयार केलेली), आवळा च्यवनप्राश – हवामातील बदलामुळे होणारे विवीध आजारांवर शरीराची नैसर्गिक रित्या रोग प्रतिकार शक्ती वाढवणे साठी.
*🧉मातीची स्वयंपाक साठी लागणारी भांडी:-*. चूल आणि गॅस दोन्ही वर वापरण्यायोग्य.
_🥛🍯सर्व उत्पादने तयार करताना फक्त भारतीय देशी गाई पासून मिळणाऱ्या पंचगव्याचा म्हणजेच दूध, तूप, दही, गोमूत्र आणि गोमय याचाच वापर केला जातो आणि *शिर्के’ज ऍग्रो फार्म* यासाठी सदैव कटिबद्ध आहे._
शिर्के’ज ऍग्रो फार्म, हें रासायनिक खते, कीटक नाशके, प्रिजरव्हेटिव्ह तस्सेच इतर केमिकल युक्त शेती व उत्पादनाचे कधीही *समर्थन करत नाही*. शेतकऱ्यांनी विषमुक्त पिकवावं आणि ग्राहकांनी विषमुक्त अन्न ग्रहण करून निरोगी राहावे यासाठीच आम्ही सदैव कार्य करत आहोत.
*🎊तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त खास गणपती सण विशेष – साजूक तूप, पंचगव्य उत्पादनावर 10% सूट*
*📦ऑर्डर प्रमाणे, ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअर ने कोठेही डिलिव्हरी मिळेल.*
*// जय गोमाता //*
*🎴संपर्क :-*
*शिर्के ऍग्रो फार्म -गोशाळा*
*वसुंधरा गोसेवा शॉपी*
तुळजा हाईट्स, विठ्ठल मंदिर जवळ, उभा बाजार, सावंतवाडी शहर, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र.
www.shirkeagrofarm.in
Customer care No. 7262955959
*गव्यसिद्ध डॉ. महादेव शिर्के*
M. D. पंचगव्य -(कांचीपुरम), CCYNS – (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), योग व निसर्गोपचार तज्ञ्.
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

