देवगड तालुक्यातील शिवसेनेचे दोन सरपंच भाजपमध्ये
देवगड तालुक्यातील शिवसेनेचे दोन सरपंच भाजपमध्ये
प्रतिनिधी-: देवगड
देवगड तालुक्यातील शिवसेनेचे पावणाई ग्रा. पं. चे सरपंच गोविंद जयवंत उर्फ पप्पू लाड व वानिवडे सरपंच प्राची प्रल्हाद घाडी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दोन सरपंचांचा प्रवेश घडवून आमदार राणेंनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा बँकेचे संचालक अॅड. प्रकाश बोडस, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते.
जामसंडे येथील भाजप कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमातआमदार राणे यांच्या उपस्थितीत पावणाई सरपंच गोविंद उर्फ पप्पू लाड, पावणाई ग्रा. पं. उपसरपंच धनंजय घाडी, ग्रा. पं. सदस्या कस्तुरी साटम, पावणाई शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र मासये, वानिवडे सरपंच प्राची घाडी, वानीवडे शाखा प्रमुख प्रल्हाद घाडी, उपशाखा प्रमुख शैलेश घाडी, शिवसेना उपविभाग प्रमुख विजयराम बाईत, तळवडे माजी सरपंच व विद्यमान ग्रा. पं. सदस्य गणेश लाड, ग्रा. पं. सदस्या सुजाता घाडी, वानिवडे उपसरपंच स्वप्नील येरम, पावणाई शाखा प्रमुख अनिल दळवी, प्रवीण पाताडे, वैभव घाडी, मनसेचे कार्यकर्ते नीलेश राघव, प्रदीप लाड, गौरव पाताडे, दीपक प्रभू, देवेंद्र लाड, समीर लाड, अमित घाडी, वैभव हातगे आदींनी प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, शिरगाव उपसरपंच अमित साटम, सदाशिव भुजबळ, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, जि. प. माजी सदस्य गणेश राणे, नगरसेविका सौ. अरुणा पाटकर, अॅड. सौ. प्रणाली माने, भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा मोर्चा देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, नरेश डामरी आदी उपस्थित होते.

