क्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अश्लिल संभाषणप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा

  • अश्लिल संभाषणप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा

    प्रतिनिधी -:वैभववाडी

    मोबाईलवरून तरुणीशी अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी येथील व्यापारी अविनाश साळुंखे (३५, रा. नाधवडे) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची साळुंखे याच्याशी ओळख होती. शिक्षणासाठी म्हणून ती घरी एकटीच राहते. याचा फायदा घेऊन साळुंखे याने आपल्या पत्नीच्या मोबाईलवरून पीडित तरुणीला फोन केला. ‘मला भेटायला ये. आपल्याला एकत्र यायचे आहे’, असे सांगून तिच्या मनात लज्जा निर्माण केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!