कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष

आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष

 

प्रतिनिधी ओरोस

 

साहील सलीम शेख या पोलिसाने पोलीस वसाहतीतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणी सबळ पुराव्याअभावी त्याची या आरोपातून मुख्य न्यायदंडाधिकारी सिलिंग ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

 

सिंधुदुर्गनगरी पोलीस वसाहतीत दरवर्षी गणपती उत्सव साजरा केला जातो. २६ सप्टेंबर २०२१ रोजी गणपती उत्सवासाठी पोलीस वसाहतीत राहणारे रामदास राणे, हिंमाशू रासम, उदय खांडेकर, ओंकार माडये, जयदास घाडीगावकर हे पोलीस वसाहतीतील बहुउद्देशीय हॉल येथील सभामंडपात बसले होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास बिल्डिंग नं. १, रुम नं. ४ मध्ये राहणारे. पोलीस अंमलदार साहील

 

शेख यांची पत्नी दादा वाचवा वाचवा, मदत करा अशी ओरडत सभामंडपात आली व पुन्हा रुमकडे धावत गेली. नेमके काय घडले हे पाहण्यासाठी तिच्या पोठोपाठ गेलेल्या पोलिसांना साहील शेख हा त्याच्या रुमच्या हॉलमधील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ खाली उतरवून सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो बरा झाला होता.

 

या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी शेख याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३०९ नुसार दोषारोप ठेवला होता. सुनावणीत सबळ पुरावा समोर न आल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!