गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के
बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षांच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.या परीक्षेला एकूण ५४ विद्यार्थी बसले होते . यामध्ये कु.दीक्षा विकास गवस ही प्रथम,कु.निशा केडु शेळके द्वितीय तर,कु. ऐश्वर्या अनिल सावंत ही तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाली.या तीनही विद्यार्थीनीनी अकौंट्न्सी याविषयात प्रावीण्य मिळवले आहे. तर बिझनेस मँनेजमेंट या विषयात कु. स्नेहल संजय आंजणे प्रथम, कु.सुलक्षणा लक्ष्मण कोकरे द्वीतीय,तर कु. श्रद्धा संतोष परब तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाली.या विद्यार्थीनीना डॉ. ए.पी.महाले प्रा.उमेश परब , प्रा.रमाकांत गावडे,डॉ.एम. एन. वालावलकर यांचे मार्गदशन लाभले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थीचे संस्थेचे अध्यक्ष श्री.डी.बी. वारंग,सचिव. एस.आर. सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व सर्व शिक्षकवर्गाने अभिनंदन केले.

