Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणराजकीय

भाजपचे युवा नेतृत्व आणि उद्योजक विशाल परब यांचा आज वाढदिवस होणार दिमाखात साजरा

 

 

एकेकाळचे कट्टर विरोधक राणे -सामंत कुटुंब असणार एकाच व्यासपीठावर

 

*कुडाळ, दि.१५:-* भाजपचे युवा नेतृत्व आणि उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सभागृहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १५ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ संगीतकार व गायक अजित कडकडे यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता विशाल परब वाढदिवस अभीष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, माजी खासदार नीलेश राणे, ‘काय झाडी, काय हाटेल’ फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रात्री ८.१५ वाजता पांढरी काठी दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा, रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर, चाकण पुणे यांचे कीर्तन, तर १० वाजता प्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्रमंडळ, सिंधुदुर्ग व जिल्हा भाजपतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!