नगरपंचायत निवडणुकीत नवख्या उमेदवाराकडून पराभूत झालेल्या राजन नाईक यांनी रोजगारासाठी विनायक राणेंवर टीका करू नये; दादा साईल
▪️अगोदर काम दाखवा आणि बक्षीस मिळवा तुमच्यासाठी अनोखी स्पर्धा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०८: आमदार वैभव नाईक जनतेच्या मनावर राज्य करणारे असते तर मग दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्याची वेळ आली नसती. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी विकास गंगा आणली सांगता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे हे सर्वच भाजपाचे होते. त्यामुळे सिंधुदुर्गासह राज्यातील सर्व जिल्ह्यांत त्यांच्या मुळे विकास निधी आला.
आमदार नितेश राणेंना घरी बसविण्याची स्वप्ने बघण्यापेक्षा तुम्हाला कोणाच्या कारणाम्यांमुळे आणि कर्मांमुळे जनतेने घरी कायमचे बसवीले याचा विचार करावा.
संजय पडते आणि सतीश सावंत यांची नारायण राणे येण्यापूर्वी काय प्रतिमा होती. हे जनतेला माहिती आहे. खरं तर याच लोकांना वाल्याचा वाल्मिकी खासदार नारायण राणे यांनी केला. खासदार नारायण राणे यांच्या विषयी बोलण्याची राजन नाईक यांची खरी औकात नाही. शिवसेनेत राणें असताना तुमच्या सह हे दोघे कीती चापलुसी करत होते, ते ही जनतेने पाहिलेले आहे. संजय पडतेंची मुलं राणेंच्या इंजिनीअरींग काँलेज मध्ये शिकली, याची जाणीव तरी ठेवायला हवी होती. शिवाय संजय पडते आणि सतीश सावंत यांना रोजगार बरीच वर्षे राणेंमुळे मिळाला, हे सुद्धा ते विसरले.
तोंड काळ करण्याची भाषा करता, तर राणें सेनेतून काँग्रेस मध्ये गेल्यावर दस्तुरखुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणात सभा घेऊन देखील कणकवली-मालवण कुडाळ-वेंगुर्ले मध्ये शिवसेनेचे डीपाँझिट गेले. त्यावेळी तुम्ही कुठल्या कंपनीचे काळे फासून फीरलात? ते देखील जाहीर करा.
संजय पडते पाठीशी राहीले म्हणता उलट विनायक राणें सारखे अनेक कार्यकर्ते राणेंमुळे पडतेंच्या पाठीशी राहिले. त्यांचे वाढदिवस आणि तुम्हाला कार्य करताना विनायक राणे यांनीच मदतीचा हात दिला होता. पण आज तुम्ही विसरला आणि नाहक टीका करू लागला. विनायक राणे ग्रामपंचायत असो वा नगरपंचायत जनतेला दीलेला न्याय आणि त्यांची पुण्याई तसेच राणेंच्या आशीर्वादामुळेच कुडाळ शहराचे पहिले नगराध्यक्ष बनले.
नगरपंचायत निवडणुकीत विनायक राणे यांच्या समोर तुमच्या आणि इतर पक्षातले स्वतः दिगग्ज समजणारे उमेदवार असताना त्यांनी मिळालेला विजय जनता अजून विसरली नाही.
वैभव नाईक शिवसेनेत आल्यापासून तुमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिकांची काय दुरवस्था झाली आहे, ते सर्व जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत इतर पक्षातून आलेले मंत्री, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी झाले. आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे निष्ठावंत शिवसैनिक मात्र अडगळीत पडले. तेव्हा तुम्हाला आमचा मोलाचा सल्ला आहे.
विनायक राणेंच्या नगरपंचायतीतील अस्तित्वाबाबत बोलण्यापेक्षा नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तुमचे अस्तीत्वच कुडाळ शहरातून दुप्पट मतांनी विजयी होऊन कायमचे मिटवीले ते बघा. विनायक राणेंसारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांवर टिका करण्यापेक्षा आधी तुमची आणि तुमच्या सारख्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षातील पत सुधारा असाही सल्ला श्री दादा साईल यांनी दिला.
*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*
🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏
*🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख
_तसेच_
🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_