*ग्रामपंचायत निगुडे तर्फे महिला बचत गटांना बँक ऑफ इंडिया च्या वतीने शिबिर
*ग्रामपंचायत निगुडे तर्फे महिला बचत गटांना बँक ऑफ इंडिया च्या वतीने शिबिर
बांदा प्रतिनिधी: ग्रामपंचायत, निगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी बँक ऑफ इंडिया शाखा- बांदा यांच्यावतीने शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रम श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर बांदा शाखेचे बँक लोन अधिकारी श्री सागर व बांदा शाखेच्या श्रीम. अश्विनी उपस्थित होते निगुडे सरपंच समीर गावडे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी व्यासपीठावर रोणापाल सरपंच सुरेश गावडे, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी दळवी, ग्रामसेविका तन्वी गवस, निवृत्त अधिकारी लक्ष्मण निगुडकर, महिला बचत गट समूह अध्यक्ष संजना केसरकर, ममता नाईक तसेच माजी अध्यक्ष शुभदा गावडे आदी उपस्थित होते रोनापाल सरपंच सुरेश गावडे यांनी निगुडे गावातील महिलांनी आपल्या सक्षम पायावर उभे राहून आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ज्या सुविधा आहेत त्या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपलं नाव लौकिक करावं असे प्रतिपादन केले तसेच बँकेचे अधिकारी श्री सागर यांनी गावातील महिलांना कर्ज पुरवठा मुद्रा लोन, शेळीपालन, किसान क्रेडिट, किसान लोन, सुकन्या योजना , पीपीएफ या संदर्भात मार्गदर्शन केले व बँकेकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा आश्वासन दिले यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं होतं त्याचा आम्ही या गावासाठी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असे आश्वासनही दिले व सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी योगेश केणी, विलास आरोसकर, नामदेव परब, सावळाराम गवंडे, श्री राऊळ निगुडे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, लहू जाधव तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग ही उपस्थित होते