कोकणराजकीय

जिल्ह्यातील युवापिढी जुगार, मटका, अवैध दारू वाहतूक यामध्ये अडकून दिवसेंदिवस बरबाद होतेय

जिल्ह्यातील युवापिढी जुगार, मटका, अवैध दारू वाहतूक यामध्ये अडकून दिवसेंदिवस बरबाद होतेय

त्वरित अवैध धंद्यावर योग्य कारवाई करा-मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर

सावंतवाडी, दि.२६:-तालुक्यात जुगार, मटका याचबरोबर जिल्ह्यात अमली पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामध्ये युवा पिढी व्यसनाच्या अधीन जाऊन फुकट जात आहेत. युवा पिढी घरातून मिळणाऱ्या पैशातून मटका, जुगार खेळतात तसेच गोव्यातील अवैध दारू वाहतूक करण्याचे काम युवापिढी करत असून युवापिढी बरबाद होत आहे याबाबत योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ रोहिणी साळुंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच सद्य स्थितीत ऑनलाईन मटका झाला असल्याने चिठ्ठ्या मिळत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. गोवा बनावटीची दारू याच रस्त्यावरून जाते परतू, त्यावर कणकवलीत कारवाई होते. याचा अर्थ काय?बांदा चेक पोस्ट वरून दारु पुढे जातेच कशी असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रक्रियेत कोणी सामील असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यानी यावेळी केली.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री संतोष भैरवकर कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मंदार नाईक कुणाल किनळेकर बाबल गावडे दीपक गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत कौस्तुभ नाईक सुरेंद्र कोठावळे प्रवीण गवस आबा चीपकर मनोज कांबळी विष्णू वस्कर वैभव धुरी मंदार सुभेदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!