🟥 रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव कोकणातून रद्द करण्याबाबत प्रसाद साळवी यांचे थेट पंतप्रधानांना पत्र..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ठाणे, दि-२६:-* कोकण हा प्रदेश अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या रांगेमधील चिंचोळा सुंदर निसर्गाने नटलेला व जैवविविधतेने परिपूर्ण असा प्रदेश आहे.खडकाळ, चंदेरी वाळूंचे रॉकीपूल, क्लिफ चे नयनरम्य व विविध जीवांचे आश्रयस्थान असलेला समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या ओहळ जांभ्या दगडाची समृद्ध पठारे त्यावर फुलणाऱ्या असंख्य दुर्मिळ वनस्पती फुले बागायतीसाठी परागीभवन करणारे कीटक सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी मासे पालेभाज्या औषधी वनस्पती असंख्य वन्य प्राणी पर्यटनाची अमर्याद क्षमता असलेला असा कोकण प्रदेश आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रेडी कॅटेगिरी मध्ये हा प्रकल्प येतो.त्याचा प्रदूषण इंडेक्स ही मोठा म्हणजे ९५ % आहे.रिफायनरी व पेट्रोल केमिकल कॉम्पलेक्स मधून सल्फरडाय ऑक्साईड आणि कार्बन डाय-ऑक्साइड चे होणारे प्रदूषण आंबा काजूच्या फुलोर्यावर सेल्फ्युरिक ऍसिडच्या रूपाने गंभीर परिणाम करे रिफायनरी व पेट्रोल केमिकल प्रकल्प चालविण्यासाठी कोळसा किंवा पेट को वर आधारित १५०० मेगा वॅटचा प्रकल्प प्रस्तावित आहे.प्रत्यक्ष विस्थापन नाही असे कंपनी सांगत असली तरी या विनाशकारी प्रकल्पाच्या बाजूलाच राहणं हे अतिशय धोकादायक आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रेड कॅटेगिरी म्हणजे अति प्रदूषणकारी वर्गवारीतील रिफायनरी पेट्रोल केमिकल औष्णिक ऊर्जा सारखे प्रकल्प आणणे म्हणजे येथील निसर्ग व स्थानिक ग्रामस्थांना देशोधडीला लावण्यासारखे आहे.
पर्यटनाची खूप क्षमता असलेला कोकण किनारा हा रिफायनरी प्रकल्पामुळे कोमेजून जाऊ शकतो पारंपारिक मच्छीमारंवर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो.येथे आंबा लागवडीसाठी उत्कृष्ट परिस्थिती आहे.कंपनी सांगत असल्याप्रमाणे जामनगर रिफायनरी परिसरात आंबा बागायती कॉर्पोरेट कंट्रोल खाली होते.पण तिकडे थोड्याशा देखील हवामानातील फरक पडणाऱ्या सेन्सिटिव अशा हापूस आंब्याची लागवड होत नाही.कोची मेंगलोर पानिपत मथुरा बिना जामनगर परादीप विशाखापट्टण आधी ठिकाणी जनतेची प्रदूषण विरुद्ध रोजगार संबंधीच्या तक्रारी चालू आहेत आंदोलने सुरू आहेत तेथील जनता प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत.
एकदा प्रकल्प बसले की तारक जातात तसे प्रशासन राजकारणी कंपनीच्या खिशात असतात.तरी हा रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द करून आपले सुंदर हिरवेगार कोकण वाचवा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

