कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

जलसंपदामंत्री जयंत पाटील ८ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

▪️राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०६: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खारेपाटण येथे सकाळी ९.३० वाजता स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे.

मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकानिहाय शरद कृषी भवन येथे बैठका होणार आहेत. असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सकाळी ९.३० वाजता जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रापुल्ल सुद्रिक आणि जिल्ह्या कार्यकारिणी व पदाधिकारी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर कणकवली येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, युवक सरचिटणीस देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुनंदार पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी त्यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने स्वागत करतील. ओरोस येथे आगमन झाल्यावर नामदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन येथे पक्षाच्या तालुकानिहाय बैठका होणार आहेत. यावेळी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करताना तालुक्याचे प्रश्न व विकासाची स्थितीही समजून घेणार आहेत. सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका, ११.३० वाजता कुडाळ तालुका, दुपारी १२ वाजता वेंगुर्ला तालुका, दुपारी १२.३० वाजता कणकवली तालुका, दुपारी १ वाजता देवगड तालुका, दुपारी १.३० वाजता दोडामार्ग तालुका, दुपारी २ वाजता वैभववाडी तालुका, दुपारी २.३० वाजता मालवण तालुक्याची बैठक होणार आहे. दुपारी ३ वाजता राखीव. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ते मोटारीने ओरोस येथून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत. तरी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!