कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 शिरोडा येथील शाळा व पोलिस इमारत बांधण्यासाठी केसरकरांना निवेदन..

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-१२: -* शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा तसेच येथील प्राथमिक शाळा इमारत बांधणी व शिरोडा पोलीस स्टेशनची पक्की इमारत बांधण्यासंदर्भात शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा शिंदे गट शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कौशिक परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

वेंगुर्ला तालुका दौ-यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच शिरोडा ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी शिरोड्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर कौशिक परब यांनी त्यांचे लक्ष वेधले. यात शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निम्म्या कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत. त्या रिक्त असलेल्या कर्मचा-यांच्या व वैद्यकीय अधिका-यांच्या जागा तात्काळ भराव्यात. तसेच वैद्यकीय अधिका-यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या इमारती जीर्ण झाल्याने त्या निर्लेखित करून पुन्हा बांधण्यात याव्यात. शिरोड्यातील प्राथमिक शाळा ही सुमारे १५० पटसंख्येची शाळा आहे. त्या शाळेची इमारत सुद्धा १०० वर्ष जुनी असून ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर उद्भवणा-या धोक्याचा विचार करता ती इमारत निर्लेखित करून पुन्हा बांधण्यात यावी.

तसेच शिरोडा पंचक्रीशीसाठी असलेल्या पोलीस स्टेशनची इमारत निर्लेखित करण्यात आली होती. मात्र आद्यपपर्यंत त्याची बांधणी झाली नाही. त्याठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. ही तात्पुरती व्यवस्था कधीही कोसळण्याची भीती असल्याने त्याठिकाणी तात्काळ पक्की इमारत बांधण्यात यावी अशी मागणी कौशिक परब यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत याची संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन वालावलकर, जिल्हा बँक माजी संचालक राजन गावडे, समृद्धी धानजी, दिलीप गावडे, प्राची नाईक यांच्यासाहित इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!