राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याचा प्रताप -अवैध धंद्याला संरक्षण तर परमिट धारकांना त्रास
राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याचा प्रताप -अवैध धंद्याला संरक्षण तर परमिट धारकांना त्रास
जावळीच्या मोरे प्रमाणे कर्तव्य बजावत असलेल्या या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करावी
राज्य उत्पादन शुल्काच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यालयात मोरा सारखा पिसारा फुलवून सगळीकडे नाचणारा कर्तव्यदक्ष अधिकारी आला असून जावळीच्या मोरे प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत असून दोन नंबर धंदा करणाऱ्या दारू विक्रेत्यांना जवळ करून त्यांची एक मीटिंग घेतली व आपला हप्ता वाढवून घेतला व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देणाऱ्या परमीट धारक बारचालकांना त्या मोबदल्यात त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन जर कोणी सुर्याजी पिसाळ होऊन फंदफितुरी करत असेल तर या जिल्ह्यात असे अधिकारी केव्हा बाहेर फेकले जातील हे त्यांना समजणारही नाही.आपला हप्ता अवैध दारू व्यवसायीकाकडून वाढवून घेऊन त्या बदल्यात शासनाची लाखो रुपये फी भरणाऱ्या परमिट धारकांना कोण अधिकारी नाहक त्रास देत असेल तर त्याचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही हे निश्चित.
एका गरुड नामक अवैध मध्य विक्रेत्यांकडून या साहेबांनेआल्या आल्या आपला हप्ता वाढवून घेतला.व त्यावेळी त्या अवैध दारू विक्रेत्याच्या माणसाने त्याचे शुटींग केले.हप्ता घेतल्यावर अवघ्या एक दोन दिवसात त्या अवैध दारू विक्रेत्याला पकडले गेले,त्यांनी साहेबांना फोन लावला,हप्ता देऊनही माझ्यवर कारवाई केली,तुम्ही माझ्याकडुन हप्ता घेत असतानाचे व्हिडिओ शुटिंग माझ्याकडे आहे ते मी सगळीकडे पाठवणार मोरा सारखा पिसारा फुलवणारा तो अधिकारी नरमला व रातोरात हप्ता घेतलेले पैसे परत केले, किती प्रामाणिक अधिकारी आपल्या जिल्ह्यात येऊन करोडो रुपये कमावून जातात हे यावरुन सीध्द होते.
या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने अवैध दारू व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्यास जिल्हा अधिक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा नागरीकांनी दिला आहे.त्यामुळे दोन नंबर वाल्यांकडून हप्ता खावून कुडाळ,मालवण,मध्ये धुमशान घालणाऱ्या या अधिकाऱ्याला त्वरित रोखावे अशी मागणी जोर धरू लागली आहे..

