कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशर क्लब च्या नावाखाली रंगताहेत जुगाराचे फड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशर क्लब च्या नावाखाली जुगाराचे रंगताहेत फड

सोशल क्लब च्या नावाखाली घोषणापत्र म्हणजे परवाना

सिंधुदुर्ग-प्रतिनिधी
सिंधुदुर्गात सोशल क्लब च्या नावाखाली जुगाराचे फड रंगत असून आमच्याकडे सोशल क्लबचे लायसन आहे,आम्ही अधिकृत खेळ खेळतो असे सांगून शासकीय यंत्रणेला गंडा घालण्याचे काम हे सोशल क्लब करत आहेत, सोशल क्लब च्या नावाखाली तीन पत्ती जुगार चालत असल्याने या सोशल क्लबच्या माध्यमातून चालवणारे मालक गब्बर झाले आहेत.
मी अमुक एक नावाचा सोशल क्लब चालवतो, या क्लब मध्ये मनोरंजनाचा खेळ अर्थात रमी खेळतो, त्यात आर्थिक व्यवहार होत नाहीत अशा प्रकारचे घोषणापत्र तयार केले जाते व त्या घोषणा पत्राच्या आधारे अशा प्रकारचे क्लब राजवसपणे सुरू आहेत,मात्र या क्लब मध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवली जात नाहीत, निव्वळ शासनाची फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारचे खोटी प्रमाणपत्र करून या क्लबच्या माध्यमातून सावंतवाडी, कुडाळ, ओरस ,कणकवली, वैभववाडी, वेंगुरला ,मालवण, देवगड, आदी भागात राजरसपणे सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे
जिल्ह्यातील सोशल कबाबत सिंधुदुर्ग पोलिसांना पूर्ण माहिती असून लाख क्लबच्या माध्यमातून काय चालते हेही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहे, मात्र या क्लब कडून मिळणाऱ्या हप्त्या मुळेच पोलीस अधिकारी मुग घेऊन गप्प बसल्या तक्रार ग्रामस्थांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!