केरळ वन संशोधन केंद्राशी करार करुन फूलपाखरु उद्यान विकसित करा-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
*🟥केरळ वन संशोधन केंद्राशी करार करुन फूलपाखरु उद्यान विकसित करा-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी , दि३सप्टेंबर.*
आंबोली येथील फूलपाखरु उद्यान विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून वन विभागाने वन संशोधन केंद्राशी करार करावा, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आंबोली येथील फूलपाखरु उद्यान, कावळेसाद, नांगरतास पॉईंटला भेट दिली. यावेळी बोलताना, ज्या झाडा भोवती फूलपाखरु येतात अशांची लागवड करायला हवी. होस्ट प्लांटची देखभाल करायला हवी. जैवविविधता भरपूर असल्याने याठिकाणी संशोधन केंद्र उभे करण्याचे नियोजन आहे. जंगल सफारी करण्यासाठी माजी सैनिक, स्थानिक तरुण यांचे सहकार्य वन विभागाने घ्यावे. प्रसिध्द शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेले पानाचे विविध प्रकाराचा अभ्यास घडविणारे “हार्बेरियम सेंटर” उभारण्यात येणार आहे. दांडेलीच्या धर्तीवर पर्यावरण केंद्र ट्री हाऊस, मड हाऊस यांचे नियोजन करावे. कावळेसाद येथील साहसी क्रीडा पर्यटन केंद्र करण्याबाबतही यावेळी सूचना केल्या. आंबोली येथील कावळेसाद पॉईंटला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, कावळेसाद पॉईंट हा सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या दृटीने अत्यंत महत्वाचं स्थळ आहे. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आंबोली येथील अन्य पर्यटन प्रकल्प लवकरच सुरू केले जातील, त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपण तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. केसरकर म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील,आंबोली सरपंच सावित्री पालेकर, गेळेचे सरपंच अंकुश कदम उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
यंदा तुमच्या बाप्पाची सजावट करा🎊 *नित्या डेकोरेटर्स* च्या सहकार्याने……!!🤩🥳
*❄️नित्या डेकोरेटर्स❄️*
_सावंतवाडी_
_घेऊन आले आहेत गणेश चतुर्थी साठी गणपती च्या सजावटीचे सर्व साहित्य एकाच दुकानात… ते सुद्धा बाजारातील इतर दुकानापेक्षा माफक दरात उपलब्ध….!!_
*🔳आमच्या येथे उपलब्ध साहित्य:*
*🏮बाली*
*🏮ब्रोच (डायमंड)*
*🏮कंठी हार*
*🏮रिबीन हार*
*🏮गोंडे*
*🏮ग्रीन मॅट*
*🏮लेस*
*🏮तोरण*
*🏮रांगोळी*
*🏮मुकुट सजावट*
*🏮चैन*
*🏮सर्व प्रकारचे हार*
*🏮मोरपीस*
*🏮इलेक्ट्रॉनिक तोरण*
*🏮फ्लावर मॅट*
*🏮सर्व प्रकारचे फोकस*
*🏮डायमंड चैन*
*🏮राऊंड बल्ब*
*🏮गोंड लडी*
*🏮फुल लडी*
_गणेश सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध…!_
*⭕आमचा पत्ता:-* भारतमाता हॉटेल नजीक, गांधी चौक-सावंतवाडी
*संपर्क:-* 9405264027
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

