सावंतवाडी पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्यामुळे चोरीचा तपास होणार -हा जावई शोध
सावंतवाडी पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्यामुळे चोरीचा तपास होणार -हा जावई शोध
आजवरचा गुन्हा अन्वेषण शाखेचा इतिहास पाहिला असता नागरिकांच्या मनात संभ्रम
सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना वाहतूक शाखेत हलवले तर फुलचंद मेंघडे सावंताडीचे नवे पोलिस निरीक्षक.
सोनुर्ली माऊली मंदिरातील चोरीचा तपास शिक्षण मंत्री व सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावाअशा सूचना केल्यावर तो तपास गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे दिल्यामुळे व सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची तात्पुरती बदली वाहतूक शाखेत केली गेली आहे त्यांच्या जागी कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंघडे यांना सावंतवाडी पाठविण्यात आले आहे व एक प्रकारे सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची खुर्ची ही संगीत खूर्ची झाली आहे.
, सोनुर्ली माऊली देवी चोरीचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे देऊन आज तीन दिवस उलटले तरी तपास शन्यू आहे,तरीही हा तपास शीघ्र गतीने होणार असून गुन्हा उघडकीस येणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.
आज पर्यंत गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या तपासाचा मागोवा घेतला असता ते चोरट्याला पकडतील याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे.
घरफोड्या ,मंदिरातील चोरी, असे गुन्हे उघड करणे हे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान असते, मंदिरातील चोरी हा भावनिक प्रश्न असला तरी पोलीसही माणस आहेत नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे,आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या माहिती द्वारे ,तांत्रिक गोष्टींचा उपयोग करून या चोऱ्या उघड करण्याचा पोलीस यंत्रणेचा प्रयत्न असतो,त्या दृष्टीने सावंतवाडी पोलीस तपास करत असताना त्यांच्याकडून तपास काढून घेऊन तो गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करणे हे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्या सारखे आहे.
गुन्हा अन्वेषण शाखेचा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला असता ही शाखा तशी नामधारी आहे, या शाखेने मोठ,मोठे दरोडे चोऱ्या उघड केल्याची क्वचितच उदाहरणे आहेत,त्या शाखेतील तपासी अधिकारी स्थानिक पोलिसांवरच अवलंबून असतात ,असे असताना गेल्या आठ दिवस या चोरीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सावंतवाडी पोलीस तपास करीत असताना त्यांच्याकडून हा तपास काढून घेऊन तो गुन्हा अन्वेषण शाखेकडे देणे हे निव्वळ एक नाटक आहे. निष्पन्न काय होणार आहे हे येत्या काही दिवसातच दिसेल, मात्र राजकीय श्रेय बाजार या ठिकाणी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण केले जाते एवढे मात्र निश्चित.
निवृत्तीला आलेल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या पदरी असलेला अनुभव याचा उपयोग करून न घेता त्याला तडका फडकी अशा प्रकारे अति तात्काळ वाहतूक शाखेत टाकन हे ही त्या अधिकाऱ्याच्या मनोधर्याचे खच्चीकरण करण्या सारखे आहे.
आमदार, मंत्री, राजकीय नेते, यांच्या हाताखालचे बाहुले शासकीय अधिकारी होत असल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे,एखाद्या राजकीय पुढाऱ्याने तक्रार करायची नंतर त्या अधिकाऱ्याची बदली करायचे हा नवीन पायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असल्याचे दिसत आहे व हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक असल्याने असल्याचे बोलले जात आहे.
सोनुर्ली माऊलीच्या देवळातील चोरी प्रकरणी एकंदरीत झालेल्या तपास ,पोलिसांनी केलेली कामगिरी याचे अवलोकन होणे गरजेचे असताना अचानक हा गुन्हा गुन्हा, गुन्हा अन्वेषण नशाखेकडे वर्ग करणे म्हणजे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासारखे आहे व हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला मुख्यालय पाठवणे हे ही त्या पोलिस अधिकाऱ्याचे मनोधैर्य खच्चीकरण करण्या सारखे आहे.
आता गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले न काय तपास करतात हे येणारा काळ ठेवणार आहे ,मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी माऊलीच्या मंदिरातील चोरीचा तपास होऊन चोरटे गजाआड होणे ही काळाची गरज आहे.