आजगाव प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर महोत्सव नियोजनासाठी ५सप्टेंबर रोजी सभेचे आयोजन
नियोजनासाठी सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी सभा
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
आजगाव क्र. १ प्राथमिक शाळेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकोत्तर महोत्सवाच्या नियोजनासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आजगाव मराठी शाळा सभागृहात माजी विद्यार्थी संघाने ही सभा आयोजित केली आहे.
या सभेत शतकोत्तर कार्यक्रमांचे नियोजन करुन विविध समित्या स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या सभेला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रामचंद्र प्रभू झाट्ये यांनी केले आहे.
