कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गणेश मुर्तीकार उदय गाड व बंधू अरुण गाड यांचा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील आदर्श विद्यार्थी ते यशस्वी शेतकरी व गवंडीकाम क्षेत्रातील यशस्वी प्रवास !

*🟥 सावंतवाडी तालुक्यात उमटवला वेगळा ठसा..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२९ :-* शालेय जीवना पासून असलेली चित्रकला विषयाची आवड व शालेय चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन मिळविलेला प्रथम व द्वितीय क्रमांक यामुळे शिक्षक, शिक्षिका यांनी केलेल्या कौतूकामुळे पुढे जाऊन माती कले विषयी निर्माण झालेली आवड! या आवडीतून सावंतवाडी येथील सोनुर्ली गावातील युवकाने गणेशमुर्ती घडविण्याचे केलेले धाडस व या धाडसातून नावारुपास आलेले गणेशमुर्तीकार उदय गाड या युवकाने वर्ष 2002 पासून सावंतवाडी तालुक्यातील उत्कृष्ट गणेश मूर्तीकार म्हणून आपला ठसा उमटवला आहे.या यशात उदय गाड यांना साथ देणारे त्यांचे मोठे बंधू अरुण गाड हेही दर्जेदार गणेश मूर्तीकार असून या दोन गणेश मुर्तीकार बंधूनी सावंतवाडी तालुक्यातील उत्कृष्ट

मुर्तीकार म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

उदय गाड व अरुण गाड हे सोनुर्ली गावचे सुपुत्र असून ते दोघेही मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या अनुक्रमे 1987-88 व 1986-87 एस. एस. सी. बॅचचे विद्यार्थी होते. शाळेत शिकत असताना या दोघांनीही अभ्यासा बरोबरच मैदानी खेळ, सांघिक खेळ व अन्य स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवून दिली होती. उदय गाड हे कब्बडी, उंच उडी, लांब उडी या खेळात अव्वल असायचे.

अर्थातच या दोघांनीही शाळा शिकून सामाजिक, आर्थिक, व्यवसायीक व विशेषतः शेती क्षेत्रात कार्यरत झाल्यानंतरही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. इतकेच नव्हे तर या दोन्ही मेहनती बंधूंनी कला क्षेत्रात भरीव योगदान देताना गणेश मुर्तीकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्ष 2002 पासून या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या या दोन्ही गणेश मुर्तीकारांनी सावंतवाडी तालुक्यातील गणेश मुर्तीकार म्हणून आपला वेगळा दर्जा निर्माण केला आहे. विशेषतः उदय गाड हे मुर्ती घडविणे, मुर्तीला सुबक आकार देणे, मुर्तीचे रंगकाम करणे या बरोबरच मुर्तीची नजर उघडणे या कठीण कामातही पारंगत आहेत. उदय यांनी नजर उघडलेल्या मुर्त्या अगदी जीवंत वाटतात. सद्यस्थितीत या दोघांच्या सोनुर्ली येथील निवासस्थाजवळ असलेल्या कार्यशाळेत यावर्षी 60 हून अधिक गणेश मुर्त्या पुर्णपणे तयार असून एक फूट ते साडेचार व पाच फूट उंचीच्या या मुर्त्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली सहीत निरवडे, मळगांव, वेत्ये, तळवडे, नेमळे, माडखोल, सहीत तोरसे (गोवा)येथे ही गाड बंधूच्या कार्यशाळेतून मुर्त्या गणेश भक्तांकडून नेल्या जातात. या कार्यशाळेत तयार होणाऱ्या मुर्त्यांना शाडू मातीचा वापर होत असल्याने त्या अधिक रेखीव व उठावदार दिसतात. दोन्ही गाड बंधू आज प्रस्थापित मुर्तीकार असून सुरुवातीला उदय गाड यांनी दहावी नंतर शेती या पारंपरिक व्यवसायात भात, नाचणी, भाजी आदी बरोबरच अन्य पुरक पिके पिकविणारे उदय गाड हे उत्कृष्ट गवंडी व मेस्त्री कामातही पारंगत आहेत. विशेषतः गणेश मूर्ती कले बरोबरच त्यांना गवंडी कामातही विशेष आवड असून त्यांना बरीच मागणी असते.गवंडी काम हा उदय गाड यांचा मुख्य व्यवसाय आहे.तर गणेश मुर्तीकार क्षेत्रात त्यांनी सर्वप्रथम वर्ष 1991-92 मध्ये पदार्पण करुन दोन वर्षे गणेश मुर्तीकार क्षेत्रात पदार्पण करुन सुरुवात केली होती. त्यानंतर उदय गाड यांनी वर्ष 1992 मध्ये नोकरी निमित्त मुंबई शहर गाठून तब्बल दहा वर्षे विक्रोळी – भांडूप येथील इंडियन लिड लिमिटेड या शिसे निर्मिती करणाऱ्या कंपनीत नोकरी केली. मात्र ही कंपनी बंद झाल्यावर त्यांनी “गड्या आपला गाव भला” असे म्हणत गाव गाठून आपली आवड व कला असलेल्या शेती, गवंडी काम, मेस्त्री काम व गणेश मुर्तीकार म्हणून उत्पन्नाचे साधन बनवून कुटूबांचा चरितार्थ यशस्वीरीत्या संभाळला आहेत. या कार्यशाळेत गाड बंधूना त्यांच्या कुटूंबियांचाही मोठा हातभार असतो.

इतकेच नव्हे तर उदय गाड हे दशावतारातील विनोदी कलाकार असून त्यांनी सोनुर्ली येथील दशावतार कंपनीतर्फे विविध ठिकाणी, विविध विनोदी भूमिका साकार केल्या आहेत. उदय गाड हे शाळेत शिकत असताना उत्कृष्ट चित्रकार म्हणून कला शिक्षक कै. पास्टे सर यांचे लाडके विद्यार्थी होते. इयत्ता आठवी पासून मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये प्रवेश घेतलेल्या उदय गाड यांचे प्राथमिक शिक्षण सोनुर्ली येथे झाले होते. तर मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये शिकत असताना विविध चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवलेल्या उदय गाड यांचे अक्षरही सुबक होते.

उदय गाड यांना युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित गणेश मुर्तीकार स्पर्धेत वर्ष 2014 मध्ये उत्कृष्ट मुर्तीकार म्हणून पारितोषिक मिळाले होते. आजही त्यांचे अनेक मान्यवर व्यक्ती, नातेवाईक, मित्र- मैत्रिणी परिवारातून कौतुक होत असते. दरम्यान उदय गाड यांना मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या एस, एस, एस. सी. चॅम्पियन्स गृप या वर्ग मित्र- मैत्रिणींच्या गृपकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!