करणारे मित्र म्हणजे श्री निर्माण मित्र : वसंत उदेग
घरं निर्माण
करणारे मित्र म्हणजे श्री निर्माण मित्र : वसंत उदेग
श्री दत्त एजन्सीचे टाईल्स ऍन्ड सिरॅमिक सॅनिटरी शोरूमचे थाटात उदघाटन संपन्न
चिपळूण (ओंकार रेळेकर) : श्री म्हणजे श्री सिमेंट कंपनी, निर्माण म्हणजे जे घरं निर्माण करतात,
इमारती निर्माण करतात आणि मित्र म्हणजे परिवार श्री सिमेंटतर्फे घरांचे निर्माण करणारे मित्र हे श्री
निर्माण मित्र होय, असे प्रतिपादन श्री दत्त एजन्सीचे मालक व उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांनी केले.
श्री दत्त एजन्सीच्या मिरजोळी येथील शोरूमचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात उदघाटन झाले, त्यावेळी
श्री. उदेग बोलत होते.
उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांच्या श्री दत्त एजन्सी या दालना शेजारीच श्री दत्त एजन्सीचे
टाईल्स अँन्ड सिरॅमिक सॅनिटरी हे भव्य शोरूम उभारण्यात आले आहे. श्री जंगरोधक सिमेंटचे महाराष्ट्र,
गोवा स्टेट हेड इस्माईल सय्यद यांच्या हस्ते फित कापून या भव्य शोरूमचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्याचे श्री सिमेंट टेक्निकल हेड साऊथ वेस्ट सुनील शिंदे,रत्नागिरी जिल्हा ऑफिसर ऋषिकेश मांजरेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा ऑफिसर रुपेश माने, सोलापूर
जिल्हा ऑफिसर चंद्रशेखर हेरवाडे, सौ.वर्षाताई उदेग,दयाळ उदेग,ओम एजन्सी कुडाळचे पार्टनर किशोर लांबे आदी मान्यवर प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांचीसुद्धा लक्षणीय उपस्थिती होती.
श्री जंगरोधक सिमेंटचे महाराष्ट्र, गोवा स्टेट हेड इस्माईल सय्यद यांनी उदघाटनपर भाषणात
उद्योजक वसंत उदेग उर्फ दादा यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, दादांनी आज सर्वसामान्य
माणसांना सोबत घेऊन आज या दालनाचे उदघाटन करून दिले, यातच तुमचा व तुमच्या संस्थेचा
मानसन्मान आहे. यातूनच आम्हाला खरी प्रेरणा मिळते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, हिमाचल,
छतीसगड या अनेक राज्यांमध्ये आपण काम केले आहे. पण गेल्या २२ वर्षात दादांसारखं उमदं नेतृत्व
आपण कधीच पाहिलं नाही. माणसाच्या आयुष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन गोष्टी अत्यंत
महत्वाच्या असतात. माझी जन्मभूमी जरी पश्चिम महाराष्ट्रातली असली तर कर्मभूमी ही कोकणातीलच
आहे. कोकणातील कर्मभूमी ही मला माझं माहेरचघरच वाटतं, असं श्री. सय्यद यांनी सांगितलं. कोकणात
गतवर्षी कोरोनाचे तसेच पावसाचे संकट आले, अशाही परिस्थितीत दादा टिकून राहिले. दादांकडे संयम
आणि माणुसकी आहे. तुमच्यासारख्या सर्व नामांकित कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांच्या सहकार्यामुळेच व
पाठिंब्यामुळेच, अशा कठिण प्रसंगातही दादा खंबीरपणे टिकून राहिले. असं टिकून राहणंही खूप
महत्वाचं आहे, असे गौरवोदगारही श्री. सय्यद यांनी यावेळी काढले. श्री जंगरोधक सिमेंट कंपनीबद्दल
बोलतांना त्यांनी सांगितले की, आमच्या श्री जंगरोधक सिमेंट कंपनीची काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.आमची कंपनी ही उत्तर भारताची, कुठलीही हद्द नसलेली, पार्टनरशीप नसलेली, सर्वात जास्त सेल करणारी, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे सिमेंट उपलब्ध असणारी, सर्वात जास्त उत्पादन क्षमता असणारी अशी ही आमची नाविन्यपूर्ण कंपनी आहे, असे त्यांनी सांगितले.श्री दत्त एजन्सीचे मालक व उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांनी प्रथम सर्व नामांकित कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांचे आभार मानले. सर्व राज मेस्त्रींना मार्गदर्शन करताना दादा म्हणाले की, लोकं दुकानाचे उदघाटन करण्यासाठी सेलिब्रेटी व राजकारणी आणतात. सेलिब्रेटी आणून दुकानं चालतात असं होत नाही. उलट नाचण्याचीच कामं होतात. पण आपण उदघाटनासाठी सेलिब्रेटी किंवा राजकारणी आणले
नाहीत. आमच्यासाठी सेलिब्रेटी तर आपण सर्वजण आहात, असे उद्देशून दादांनी सर्व राजमेस्त्रींना सांगितले. श्री सिमेंट कंपनीने श्री निर्माण मित्र ही दोन वर्षांपूर्वी योजना काढलेली आहे. मात्र, या योजनेचे आपल्याला फारसं गांभीर्य नव्हतं. जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ असं सुमारे सहा महिन्यात सुमारे २०० च्या वरती गीफ्ट आली आहेत. त्यानंतर जानेवारी २०२२ ते जून २०२२ या सहा महिन्याचे गीफ्ट अजून आलेले नाही. त्यानंतर जुलै २०२२ ते ऑगस्ट या महिन्याचेदेखील गीफ्ट अद्याप आलेले नाही. ही योजना डिसेंबर २०२२ ला संपत आहे. श्री निर्माण मित्र या योजनेत केवळ ५५ लोकंच रजिस्टर झालेली आहेत. अजून बरीच लोकं रजिस्टर व्हायची बाकी आहेत. भारतामध्ये उच्चांकी सिमेंट सेल केलेली कंपनी म्हणून श्री
जंगरोधक सिमेंट कंपनीचा उल्लेख होतो. श्री दत्त एजन्सीने २०१५-१६ मध्ये एका महिन्यात उच्चांकी विक्री
करून २५ दुचाकी वाहने रत्नागिरीत वितरीत केलेली आहेत. भारतात नव्हे तर जगात सर्वाधिक विक्री
करणारी श्री दत्त एजन्सी ही एकमेव कंपनी आहे, असा नामोल्लेखही दादांनी आपल्या भाषणात केला.
गतवर्षी या कंपनीने साताऱ्यामध्ये ७ बुलेट, ६ युनिकॉर्न आणि ४ ॲक्ट्रीव्हा वितरीत केल्या आहेत. पण या
सर्वांच्या उपस्थितीत आपण हे आव्हान स्वीकारले असून साताऱ्याचे हे रेकॉर्ड येत्या काही दिवसात आपण
मोडणार असल्याचे दादांनी यावेळी सांगितले. एका महिन्यात २५ मोटारसायकल वितरीत करू शकतो,
त्याला हे आव्हान फार कठीण नाही. असेही दादा म्हणाले. श्री निर्माण मित्र या योजनेबद्दल सांगताना दादा
म्हणाले की, श्री म्हणजे श्री सिमेंट कंपनी, निर्माण म्हणजे जे घरं निर्माण करतात, इमारती निर्माण करतात
आणि मित्र म्हणजे परिवार श्री सिमेंटतर्फे घरांचे निर्माण करणारे मित्र हे श्री निर्माण मित्र. ही योजना फक्त
श्री सिमेंटतर्फेच सुरू आहे. मात्र, गेली दोन वर्षे या योजनेची आपण पाहिजे तेवढी दखल घेतली नाही. या
योजनेतून आलेल्या २०० बक्षिसांबद्दल आपण समाधानी नसल्याचे दादा उदेग यांनी सांगितले. येणाऱ्या
कालावधीत आपल्याला २०० बक्षिसे नव्हे तर १ हजार प्लस बक्षिसे आम्हाला मिळालीच पाहिजेत. यासाठी सर्व राज मेस्त्रींच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहू, असे खुले आव्हानच दादांनी कंपनीचे साऊथ
वेस्टचे टेक्नीकल हेड सुनील शिंदे व त्यांच्या टीमला दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रकाश गांधी
यांनी केले. श्री दत्त एजन्सी कंपनीतील सर्व कर्मचारी वृंदांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे योग्य नियोजन
केल्याबद्दल दादांनी या सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.
फोटो : श्री दत्त एजन्सीचे टाईल्स अँन्ड सिरॅमिक सॅनिटरी हे भव्य शोरूमचे उद्घाटन करताना श्री जंगरोधक सिमेंटचे महाराष्ट्र, गोवा स्टेट हेड इस्माईल सय्यद सोबत श्री दत्त एजन्सीचे मालक व उद्योजक वसंत ऊर्फ दादा उदेग,
सौ. वर्षा उदेग, श्री सिमेंट टेक्निकल हेड साऊथ वेस्ट सुनिल शिंदे व मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)