कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भंडारी समाज पतसंस्थेचा सलग अकरावर्षे ऑडीट वर्ग ‘अ

भंडारी समाज पतसंस्थेचा सलग अकरावर्षे ऑडीट वर्ग ‘अ’

सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट (प्रतिनिधी)
सावंतवाडी येथील भंडारी समाज ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सावंतवाडी या पतसंस्थेला सलग अकरा वर्षे ‘अ’ वर्ग प्राप्त झाल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुदास पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २८ व्या अधिमंडळ वार्षिक बैठकीत दिली.

सभासदांचे स्वागत उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ पेडणेकर यांनी करून अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने सभेच्या प्रारंभी पतसंस्थेचे दिवंगत सभासद, हितचितक, व ठेवीदार इतर महनिय व्यक्ति तसेच विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सभेला व्यवस्थापक श्री. दिपक सरमळकर यांनी रीतसर सुरूवात केली. सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. पतसंस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या विशयांवर चर्चा करण्यात आली.

संस्था स्थापने पासून पतसंस्था बाहेरून कर्ज न उभारता स्वभांडवल व ठेवीतून कर्ज वाटप करीत आहे तसेच सलग ११ वर्षे संस्था ऑडीट वर्ग ‘अ’ राखून आहे ही बाब खरोखरच गौरवास्पद आहे. तसेच संस्थेच्या वाढत्या कामाचा व्याप संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग व पिम्मी एजेंट कार्यक्षमतेने सांभाळीत आहेत हे विशेष उल्लेखनीय असून संचालक मंडळाचे उपस्थित सभासदांनी अभिनंदन केले. यावेळी सभासद श्री. दिनेश नागवेकर यांनी नविन संचालक मंडळ यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या बैठकीत संस्थेच्या संचालक मंडळावर तज्ञसंचालक म्हणून रामचंद्र कोचरेकर व कमलाकांत मुंडये याच्या निवडीस मान्यता देण्यात आली. तसेच सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर पतसंस्थेचे अध्यक्ष गुरूदास पेडणेकर, उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ पेडणेकर, संचालक अशोक बुगडे, गुंडू साटेलकर, चंद्रशेखर पेडणेकर, संजय पिळणकर, संचालिका समता सुर्याजी, वैशाली पटेकर तसेच संस्था कर्मचारी लिपीक श्रीम. देवता पेडणेकर व सुनिल दळवी उपस्थित होते.

या बैठकीला सभासद सर्वश्री देवीदास आडारकर, रमेश पई, संतोष बैज, प्रसाद अरविंदेकर, भरत कांबळी, उमा वराडकर, अरविंद वराडकर, प्रो. दिलीप गोडकर, सुरेश राऊळ, सुमन सुभेदार, श्रीकृष्ण भगत, सुधिर पराडकर, कुडव, जेष्ठ सभासद अँड. श्रीधर पराडकर, राजाराम गवंडे, राजेंद्र बिर्जे, चंद्रकांत कोरगावकर अल्पबचत प्रतीनीधी सी. संजना धुरी, गुरुप्रसाद वाडकर हजर होते.

या बैठकीला उपस्थित असलेल्या सभासदांचे आभार संचालक श्री. संजय पिळणकर यांनी मानले.

फोटो
भंडारी समाज पतसंस्थेच्या सभेत उपस्थित मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!