🟥 एमआयटी एमच्या वतीने घेण्यात आलेल्या मॉक सीईटी २०२२ मध्ये वेंगुर्लेचा अजिंक्य डिसोजा प्रथम
*🟥 संजय घोडावतचा पियुष कुशे द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल मालवण चेतन वडार तृतीय*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२१:-* मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड ओरोस रेल्वे स्टेशन नजीक यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्यांची गुणवत्ता वाढावी या सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या मॉक सीईटी २०२२ मध्ये वेंगुर्ल्याच्या खर्डेकर कॉलेजचा विद्यार्थी अजिंक्य अँथोनी डिसोजा याने प्रथम क्रमांक मिळवला. तर संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरच्या पियुष सागर कुशे याने द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल मालवणच्या चेतन गंगाराम वडार याने तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना एमआयटीएमच्या वतीने रोख रक्कमेची पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
एमआयटीएमच्या वतीने दरवर्षी MHT- CET साठी सराव परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा महिनाभराच्या कालावधीत चार टप्प्यात घेण्यात आली. अंतिम मॉक टेस्ट २२ जुलैला घेण्यात आली. या जिल्ह्यातील ४०० विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वत व प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी प्राचार्य सूर्यकांत नवले, संयोजक प्रो. सुकन्या सावंत, प्रो. तुषार मालपेकर, प्रो. मनोज खाडिलकर आणि टीम यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाबद्दल सहभागी. विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा खूप फायदा घेता आला, असे मत पालकांनी व्यक्त केले.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*
*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*
*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*
*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*
*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

