🟥 मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये संपन्न झालेल्या गीत गायन स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी मिळवली वाहवा !
*🟥 माजी सैनिक आनंद राणे यांनी सांगितले कारगील युद्धातील थरारक प्रसंग..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिंतन,हेमंत,शैलजा परब सभागृहात संपन्न झालेला गीत गायन व प्रभात फेरी कार्यक्रम तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 13 आॅगस्ट 2022 ते 17 आॅगस्ट 2022 पर्यंत विविध कार्यक्रम पार पडले.
या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत 13 आॅगस्ट 2022 रोजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या दिवशी मळगांव बाजार पेठ परिसरात प्रभातफेरी काढून देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. तसेच या दिवशी इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचा लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचा मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेचे सहाय्यक शिक्षक तिवरेकर सर यांनी, ” आपला भारत देश कशा प्रकारे स्वतंत्र झाला” त्याचप्रमाणे आपल्या देवाप्रती भावना कशी असली पाहिजे याबाबत हृदयस्पर्शी उदाहरणे दिली. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले. आपण आता जर गाफील राहीलो तर पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. शत्रू राष्ट्रे जपलेली आहेत. ” अशी भीती व्यक्त केली.
यानंतर 14 आॅगस्ट 2022 रोजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर भारताचा अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनी 15 आॅगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या सभागृहात देशभक्तीपर स्पर्धेत विजेता ठरलेल्या वर्गांना पारितोषिके देण्यात आली. या मध्ये लहान गटातील इयत्ता सहावीच्या गटाने क्रमांक पटकावला. तर इयत्ता पाचवीच्या गटाने द्वितीय व इयत्ता सातवी च्या गटाने तिसरा क्रमांक पटकावला. मोठ्या गटातून इयत्ता नववी (ब) च्या गटाने प्रथम क्रमांक , नववी ( अ) च्या गटाने द्वितीय क्रमांक तर इयत्ता आठवी (ब) च्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला.
अमृत महोत्सवाच्या या सांगता कार्यक्रमाला व पारितोषिक वितरण कार्यक्रमात शाळा समिती सदस्य दिपक जोशी, आर्मी मॅन आनंद राणे, तसेच प्रमुख उपस्थित प्रिया नाईक, पिंटो मॅडम, प्रविण नाईक,पत्रकार सुखदेव राऊळ, मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, पर्यवेक्षक फाले सर, ज्येष्ठ शिक्षक कदम सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आर्मी मॅन आनंद राणे यांनी आपल्या सीमेवरील अनुभवाच्या आठवणी सांगताना कारगील युद्धातील थरार व या युद्धातील सात दिवसांचा अंगावर काटा उभा करणारे अनुभव सांगितले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून मातोंडकर मॅडम, आसोलकर मॅडम, कदम सर, गोसावी मॅडम,मोर्ये मॅडम यांनी काम पाहिले.तर या कार्यक्रमात हार्मोनियम वादक म्हणून सतीश राऊळ, पखवाज वादक म्हणूनराहूल राणे, ओमप्रकाश गोसावी, प्रणव गोसावी, सिद्धेश भांडेभांडे यांनी साथ दिली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांची ही साथ लाभली.
यावेळी प्रशालेतील शिक्षक- शिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी माजी विद्यार्थी आनंद गावडे यांनी शाळेला पाच हजार रुपये देणगी स्वरुपात दिले. तर प्रिया नाईक, मुंबईतील रहिवासी पिंन्टो मॅडम यांनी ही पाच पाच हजार रुपये देणगी स्वरुपात दिले. अमृत महोत्सवाचा या सांगता समारोह कार्यक्रमाचे सूत्र संचालन कारीवडेकर सर व सावंत सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी. बी. सावंत सर, सावंत- भोसले मॅडम, केसरकर सर, वृषाली माळकर यांचे सहकार्य लाभले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃
*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*
_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

