क्राइममुंबईशासकीयसामाजिक

महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकार संघटनांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करणार नसल्याचे केले स्पष्ट..

▪️गोस्वामी अटकेचा व पत्रकार गळचेपीचा संबंध नाही; संघटनांचे स्पष्टीकरण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.०४: रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.

मे २०१८ मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती. पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल.

अर्नब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही. असे आम्हाला वाटते असे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती चे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

तर एन युजे चे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी म्हटले आहे की, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध एनयुजे महाराष्ट्र करणार नाही. रिपब्लिकन चँनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. ती २०१८ च्या मे मध्ये अलिबाग च्या कावीर येथील वास्तुविषारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती.

अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची भली मोठी रक्कम काम करूनही देण्यात न आल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. गोस्वामी यांचे विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अन्वय नाईक यांच्या पत्नीने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने  चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. हा विषय दोन व्यक्तींच्या मृत्यूचा आहे. आर्णब गोस्वामी यांच्या अटकेची एनयुजे महाराष्ट्र निषेध करणार नाही. हा पत्रकारितेवरचा हल्ला नाही किंवा चौथ्या स्तंभाची गळचेपी नाही. महाराष्ट्रात पत्रकारितेला आणीबाणी लागली आहे असे कुणी म्हणत असेल तर ते पूर्णता चुकीचे आहे. पत्रकारितेचा मुखवटा घेऊन अन्यायकारक कृत्य करणे कधीही समर्थनीय नाही. आर्णब गोस्वामीच्या इतर कार्याबद्दल बोलण्याची गरज नाही. कारण पत्रकारितेला मर्यादा व कायद्याचे भान हवेच! असे न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे गोस्वामीच्या चँनलवरील कार्याला, सूत्रसंचालन करण्याला पत्रकारिता म्हणता येणार नाही.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र या अटकेचा निषेध करणार नाही. न्यायाचे राज्य सर्वासाठी समान असावे. पत्रकारितेचे शस्त्र हाती घेऊन अंधपणे इतरांवर हल्ला करणे, लोकांत गैरसमज पसरवणे ही पत्रकारिता नाहीच! असे म्हटले आहे.

तर जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्र चे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी ही अर्णव यांच्या अटकेचा पत्रकारितेशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. ते पूढे म्हणाले, पत्रकारितेच्या नावावर कुणी इतरांवर हल्ला करीत असेल, अथवा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत असेल, तर ती पत्रकारिता मानता येणार नाही.

रिपब्लिक वाहिनीच्या अर्णब गोस्वामी याला सिआयडी ने चौकशी करून अटक केली आहे, कायद्यापुढे सर्व समान आहेत, पत्रकार म्हणून अन्यायकारक कृत्य करणे याचे कधीही समर्थन केले जाणार नाही, त्यामुळे, चौथा स्तंभ व पत्रकारितेवर हल्ला झाला हे मान्य होणार नाही.

पत्रकारिता करताना मर्यादा व कायद्याचे भान ठेऊनच वागले पाहिजे, त्यामुळे, गोस्वामी च्या अटकेचा निषेध जेयूएम करणार नसल्याचे म्हटले आहे.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकार संघटनांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करणार नसल्याचे केले स्पष्ट..

  • kiran Sakharam Kamat

    देवाच्या” काठीला आवाजाचं आणि वेळेचं बंधन नसते !!
    पण *दणका* मात्र बिनतोड नि जबरदस्त !!!
    👌🙏🙏🙏👍🔥🚩🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!