आणलेल्या काव्यावचाच्या निचातल “लोणी” कोणी खाल्ले…?
आणलेल्या काव्यावचाच्या निचातल “लोणी” कोणी खाल्ले…?
*सावंतवाडी ता.१७:* दिपक केसरकर यांच्या जिवावर ठेकेदारांकडून लाखो रुपयाचे कमिशन लुटणारे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ शिवसेनेत राहिल्या मुळे दुकान बंद झाले आहे, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जेष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला.
दरम्यान आमचे नेते असलेल्या केसरकरांवर राऊळ यांनी टिका करू नये, त्यांच्या केसाला हात लावण्याची तुमची पात्रता नाही. जास्त बोललात तर कोण-कोणत्या ठेकेदाराकडे पैसे मागितलात ही माहीती जाहीर करू. अनेकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, असा इशारा सुध्दा त्यांनी यावेळी दिला. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी लोबो म्हणाले, केसरकर यांच्यावर टिका करण्याची राऊळ यांची पात्रता नाही. निधी कीती आणला असे विचारणा करणाऱ्या राऊळ यांनी आपण आलेल्या निधीतून कीती लोणी खाल्ले, याचे उत्तर द्यावे, कामे मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात पैसे मागितले. कामातून सुटणाऱ्या फायद्यापेक्षा त्यांनी मागितलेली रक्कम जास्त होती. अशा अनेक ठेकेदारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जास्त बोलायला लावू नका, अन्यथा सर्व प्रकार उघड करू, असा इशारा त्यांनी दिला.