सुशील चिंदरकर म्हणजे शिवसेनेतील जोकर; भाजयुमो तालुकाध्यक्ष वरूणेश्वर राणे
▪️‘रणजित देसाई’ या व्यक्तिमत्त्वाचा फटका आमदार वैभव नाईक यांना मागील निवडणुकीत बसला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०४: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण जिल्ह्यात एक शांत संयमी आणि लोकांच्या मनावर आपल्या स्वकर्तृत्वाने आदराचे स्थान मिळवलेले नाव आहे. त्यांच्या कार्यातून हे वेळोवेळी जिल्ह्यातील जनतेला दिसून आले आहे, आणि त्याचा सर्वात मोठा फटका आमदार वैभव नाईक यांना मागील निवडणुकीत बसला. फक्त आठ दिवसात हे चिंदरकरांचे भाग्यविधाते, जे मी घरी बसून पण देसाईंविरुद्ध निवडून येईन अशी भीमगर्जना करत होते, त्यांना रात्रंदिवस पायाला चाक लावून फिरावे लागले, त्यांना आपले स्वतःचे भाग्य उजळवून घेण्यासाठी ‘भाग्यविधाते’ म्हणविणारे हास्यास्पद वक्तव्य करून सुशील चिंदरकरांनी जोकरची भूमिका करू नये. असा पुन्हा एकदा मित्रत्वाचा सल्ला भाजपाचे कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष वरूणेश्वर राणे यांनी दिला आहे.
श्री. राणे पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी कुडाळ मध्ये जिल्ह्यातील महिलांसाठीचे हॉस्पिटल २०१३ मध्ये मंजूर करून भूमिपूजन केले व इमारतीचे बांधकाम सुरू होऊन ते आज पूर्णत्वालाही गेले. फक्त माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्याचे श्रेय द्यावेच लागेल, या भीती आणि असूयेपोटी आजपर्यंत ते सुरु करू न शकलेल्याना कोणाचे भाग्यविधाते म्हणायचे? औषधोपंचारांवाचून तडफडणाऱ्या मायभगिनी तुमच्या भाग्यविधात्याला दिसत नाहीत का? हा सर्वच महिलांवर सरळसरळ अन्यायच आहे. हुमरस प्रकरणात स्वतःच्याच पक्ष परिवारातील महिलेवर अन्याय अत्याचार झाले असताना तोंडावर आणि डोळ्यावर पट्टी बांधणारे नक्की कोणाचे भाग्यविधाते म्हणून वावरत होते, हे पण चिंदरकरांनी स्पष्ट करावे. चिपी विमानतळ, सी वर्ल्ड सारखे प्रकल्प आज सुरु न झाल्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध करू न शकलेले भाग्यविधाते कसे? याउलट, रणजित देसाई यांनी कृषी मधून किती तरी महिला व युवकांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दिला. शेतकरी व महिला बचत गटांना यशाचा मार्ग देणारा कृषी महोत्सव वेळोवेळी यशस्वी करून दाखवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आधुनिक शेतकरी बनवले. विकासाची दृष्टीच नसलेल्या तुमच्या तथाकथित भाग्यविधात्यांना मंत्री पद न देता दुसऱ्या जिल्ह्यातून पर्याय देण्यात आला. दुसऱ्याचे भाग्य पुसण्याच्या नादात तेलही गेले आणि तूपही गेले, हाती फक्त रत्नागिरीचे धुपाटणे आले. जिल्ह्याला मिळणारे हक्काचे पालकमंत्रीपद घालवण्याचे काम तुमच्या भाग्यविधात्यांच्या राजकारणामुळे झाले. याची खंत इथले तुमच्याच पक्षाचे माजी पालकमंत्री स्वतः बोलुन दाखवतात आणि या जिल्ह्याचे भाग्य काही जणांनी आपल्या हाताने पुसल्याचे मत व्यक्त करतात, हे लक्षात घ्यावे. व्यक्तीगत भाग्य खुलण्यासाठी उगाचच लाळघोटेपणा करत एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करणे आता तरी शिवसेनेने बंद करावे. तुमचे भाग्यविधाते जरूर तुमच्या घरात पूजा, पण चिखलफेकीचे राजकारण आता बंद करा. राजकारण करून स्पर्धा करायची असेल तर विकासाची करा, ते जमत नसेल तर तुमच्या नेत्यांसारखेच घरात गप्प बसा. राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी जर बदनामीच्या षडयंत्राची घाणेरडी राजकारणे खेळू पाहाल, तर ते मोडून घालण्यासाठी यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. याची जाणीव ठेवा, उगाच आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा खणखणीत इशारा श्री. राणे यांनी दिला आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_