🟥 मडूरा दशक्रोशित वीज वितरणाचा भोंगळ कारभारामुळे वीजग्राहक त्रस्त..
*🟥 तात्काळ दक्षता घ्यावी.. अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही..*
*🟥 सतार्डा शिवसेना उपविभाग प्रमुख तथा मडूरा माजी उपसरपंच उल्हास परब यांचा इशारा..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३ :-* गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मडुरा दशक्रोशीत मात्र वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. घेराव, उपोषण छेडल्यानंतर भरीव आश्वासन दिली जातात त्याची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सेवेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख तथा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी वीज वितरणला दिला.
श्री. परब म्हणाले की विजेच्या लपंडावासोबत विद्युत वाहिन्या तुटण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची दखल घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा अखंडीत ठेवत कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख उल्हास परब यांनी दिला आहे.
मडुरा-डिगवाडी परिसरात दोन वेळा विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडले.वाहिनी तुटल्यानंतर वीजपुरवठा खंडित होणे आवश्यक आहे मात्र तसे न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यावर विद्युत विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. विजेचा खेळखंडोबा मात्र सुरूच आहे. तर पाडलोस येथे वाहिन्यांवरील झुडपे तोडताना वाहिन्यांनी अचानक पेट घेतला असे प्रकार यापुढे होता कामा नये अशी तंबीच श्री. परब यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच ग्राहकांच्या माथी भरमसाठ वीज बिले मारून नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवाल श्री.परब यांनी केला.
गतवर्षी गणेशोत्सवात मडुरा दशक्रोशीतील गावात वीज गुल होण्याचे प्रकार घडले मात्र यावर्षी तसे सहन केले जाणार नाही. त्यामुळे वेळीच दखल घेत विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी उल्हास परब यांनी केली आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

