कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद शाळा सुकळवाड या शाळेला शिक्षक मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन कमिटीने घेतली मालवण गटविकास अधिकारेंची भेट

*जिल्हा परिषद शाळा सुकळवाड या शाळेला शिक्षक मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन कमिटीने घेतली मालवण गटविकास अधिकारेंची भेट*

*शाळेला शिक्षक नाही मिळाला तर १५ ऑगस्ट नंतर शाळा बंद आंदोलनाचा इशारा*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

मालवण तालुक्यातील पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळा सुकळवाड या जि.प.शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि सुकळवाड गावराई पंचक्रोशी शिक्षण संस्था पदाधिकारी,पालक यांची बैठक झाली होती.त्या बैठकीत स्वच्छता, शिस्त, शैक्षणिक दर्जा , शालेय अडचणी इ. विषयांवर चर्चा करण्यात आली होती
बी.एस.बीएड शिक्षक खाजगी स्वरूपात ग्रामपंचायत, पालक आणि ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने नेमण्याचे ठरले.मंजुर शिक्षक ५असताना ४ शिक्षकच कार्यरत आहेत. एका शिक्षकाची मागणी मालवण गटविकास आप्पासाहेब गुजर यांचे कडे करण्यात आली.अन्यथा १५ ऑगस्ट नंतर शाळा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुर्यकांत दाभोलकर,सुकळवाड गावराई पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्ष प्रकाश पावसकर, उपसरपंच स्वप्निल गावडे, बाप्पा पाताडे,पालक चव्हाण, विलास मसुरकर,विराज वाळके,अमित मुळदेकर तसेच जिल्हा बँक संचालक बाबा परब ,अशोक सावंत उपस्थित होते. एक शिक्षक देण्याचे गटविकास अधिकारी यांनी मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!