कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

*कसाल हायस्कूल येथे ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन

*कसाल हायस्कूल येथे ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन*

*जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शुभारंभ*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कसाल हायस्कूल सभागृह येथे कसाल येथील रहिवासी ओंमकार कदम या युवकांनी संकलित केलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतर अनेक राजे ,महाराजे, राज्य, व चलणी नोटांचे व नाण्यांचे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी गावाच्या वतीने कसाल सरपंच संगीता परब व कसाल इंग्लिश स्कूलचे सचिव यशवंत परब यांच्या हस्ते प्रदीप नायर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण उदय जांभवडेकर कसाल हायस्कूल मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर कसाल सरपंच संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, ग्रामविकास अधिकारी सौ एस बी कोकरे शिक्षक वृद्ध ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रदर्शनात 205 देशातील पूर्वकालीन नाणी ठेवण्यात आले आहेत यामध्ये अनेक महाराजांच्या कार्यातील विविध प्रकारच्या चलणी नाण्यांचे तसेच स्वतंत्र काळापासूनच्या भारतीय चलनी नाण्यांचे व नोटांचे प्रदर्शन ऐतिहासिक मानण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी ओंमकार कदम या युवकाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!