कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

मांगेलीत विजेचा लपंडाव

*🟥 मांगेलीत विजेचा लपंडाव*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सौ. प्रांजल गवस*

*🎴 दोडामार्ग,दि-०10:-ऑगस्ट*

गेले वीस बावीस दिवस मांगेलीत वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे, पाऊस व वारा मांगेलीत जास्त असल्याने दरवर्षी हा प्राॅब्लेम होतो व चार चार आठ आठ दिवस काळोखात काढावे लागतात. त्यात यावर्षी मांगेलीसाठी स्वतंत्र वायरमन नाही. मांगेलीत घातलेला वायरमन काम नको म्हणून सोडून जातो. व त्यामुळे कीत्येक दिवस अंधारात मांगेलीवासियाना काढावे लागतात. या वर्षी हे प्रमाण खुपच आहे. वरीष्ठाना कळवून सुद्धा काहीचं उपयोग होत नाही. त्यामुळे ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.
तसेच पाऊस व वारा जास्त असल्यामुळे खोक्रलहुन मांगेलीपर्यत जाणारी मुख्य लाईन रस्त्याने केबल (गोव्याच्या धर्तीवर) टाकून मिळावी यासाठी यापुर्वी निवेदने दीली असल्याचे माजी सरपंच श्री विजय गवस यांनी सांगितले मात्र कार्यवाही अजून काही नाही.पं स. सदस्य मा. श्री बाबूराव धुरी यांनी याबाबत आज दोडामार्गचे मुख्य वीज अभियंता श्री नलावडे यांना धारेवर धरले. कोणत्याही परीस्थितीत उद्या माणस (गँग) घेवून फाॅल्ट काडून काम पुर्ण करा.असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!