भारतीय अमृत महोत्सव 2022 निमित्ताने मळगांव ग्रामपंचायत मळगांव च्या वतीने भव्य कार्यक्रम व उपक्रम
भारतीय अमृत महोत्सव 2022 निमित्ताने मळगांव ग्रामपंचायत मळगांव च्या वतीने भव्य कार्यक्रम व उपक्रम
विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, आजी- माजी सैनिक, माजी पोलीस अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
भारतीय अमृत महोत्सव 2022 निमित्ताने मळगांव ग्रामपंचायत मळगांव च्या वतीने बुधवारी मळगांव बाजारपेठ व मळगांव गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मळगांव सरपंच, उपसरपंच यांच्या सहीत सर्व पक्षीय ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गट सदस्य व सी. आर. पी., अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच ग्रामस्थ, समाज सेवक, व्यवसायीक, दुकानदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
भारतीय अमृत महोत्सवा निमित्ताने शासनामार्फत आखून देण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेतील कार्यक्रमांतर्गत 9 आॅगस्ट या क्रांतीदिनादिवशी मंगळावरी मळगांव मध्ये नागरिकांनी तसेच सर्व ग्रामस्थ गृहिणी यांनी घराबाहेर सडा रांगोळी काढणे, घराला तोरणे लावणे, प्रभातफेरी काढणे याशिवाय सरपंच- ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशासेविका,शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या साठी स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन करणे आदी कार्यक्रम राबविण्यात आले. तर आज बुधवार दिनांक 10 आॅगस्ट 2022 रोजी मळगांव बाजारपेठ परिसरात भव्य स्वचू मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मळगांव सरपंच , उपसरपंच यांच्या सहीत ग्रामपंचायत सदस्य, अंगणसेविका , सी. आर. पी. ,स्वच्छता दूत ग्रामस्थ , दुकानदार- व्यवसायीक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमा सहीत बुधवारी अंगणवाडी सेविका- आशासेविका-शिक्षकवृंद यांचे महिला मेळावे संपन करण्यात आले. तर गुरुवार दिनांक 11 आॅगस्ट 2022 रोजी अंगणवाडी सेविका व आशासेविका यांचे महिला बचत गटांना मार्गदर्शन, शाळांचे मुख्याध्यापक- विद्यार्थी/विद्यार्थीनी – ज्येष्ठ नागरिक यांचे गाव इतिहास व राष्ट्राचा इतिहास याबाबत मार्गदर्शन तसेच शुक्रवार दिनांक 12 आॅगस्ट रोजी मोबाईलचे दुष्परिणाम यावर आरोग्य अधिकारी व संगणक तज्ञ यांचे मार्गदर्शन व चर्चा तसेच बॅंक अधिकारी व पतसंस्था अधिकारी यांचे अर्थ साक्षरता विषयक शिबीर, अंगणवाडी अध्यापिका यांचे आर्थिक विकास नियोजन, दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत शनिवार दिनांक 13 आॅगस्ट 2022 रोजी श्री गोपाळांची पंगत व ग्रामस्थांना सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन, शेतक मेळावे व मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. रविवार दिनांक 14 आॅगस्ट 2022 रोजी ग्रामसेवक- कृषी व वन अधिकारी यांच्या मार्फत शेतकरी व ग्रामस्थ यांना पर्यावरण संवर्धन शपथ , ग्रामसेवक- कृषी व वन अधिकारी व विद्यार्थी- विद्यार्थीनी,शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मार्फत वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार दिनांक 15 आॅगस्ट 2022 रोजी अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सकाळी शाळा- शासकीय व निमशासकीय कार्यालये व ग्रामस्थ यांची भव्य प्रभातफेरी तसेच शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थीनी व ग्रामस्थ यांच्या शालेय स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दिनांक 16 आॅगस्ट 2022 रोजी वैद्यकीय अधिकारी यांचे किशोरी मेळावे व समुपदेशन कार्यक्रम, गावातील लोककलाकार- ग्रामस्थ-प्रबोधनकार-विद्यार्थी व विद्यार्थीनी, शिक्षक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन-देशभक्तीपर कार्यक्रम-स्वराज्य फेरी हे कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार दिनांक 17 आॅगस्ट 2022 रोजी सर्व ग्रामस्थ-कलाकार-विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक यांच्या मार्फत स्वराज्य महोत्सव सांगता समारोह- स्वराज्य फेरी- देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.
या प्रत्येक उपक्रमाच्या संयोजनात सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी नियोजन करावयाचे आहे. यासाठी सरपंच स्नेहल जामदार व ग्राम विकास अधिकारी यांनी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

