कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्याबाबत आयोजित माहितीपर ग्रंथांचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्याबाबत आयोजित माहितीपर ग्रंथांचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल”.

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक भिकाजी सामंत यांचे कौतुगोद्गार

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्याबाबत आयोजित माहितीपर ग्रंथांचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल”.तसेच कै. उदय खानोलकर वाचन मंदिराचा हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असल्याचे उद्गार ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक भिकाजी सामंत यांनी काढले.
या ग्रंथ प्रदर्शनाचे दिपप्रज्वलन भिकाजी सामंत व यशवंत राऊळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी वाचन मंदिराचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर,उपाध्यक्ष बाबली नार्वेकर,संचालक महेश पंतवालावलकर, सौ. स्नेहा खानोलकर, ग्रंथपाल आनंद देवळी, सौ. पूर्वा नार्वेकर आद उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी प्रास्ताविक करून वाचनालय करीत असलेले उपक्रम व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाविषयीच्या कार्यक्रमाची माहिती सांगितली. हे ग्रंथ प्रदर्शन बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 पर्यंत खुले राहणार असून याचा लाभ विद्यार्थी वर्गाने व वाचकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!