कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सदस्य भगवान रेडकर यांना मातृशोक

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सदस्य भगवान रेडकर यांना मातृशोक

सावंतवाडी ( सुखदेव राऊळ)

मळगांव रेडकरवाडी येथील रहिवासी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सक्रीय सदस्य भगवान उर्फ दाजी रेडकर व महेंद्र रेडकर यांची ती आई सौ. मंदाकिनी मोहन रेडकर (६०) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस तिच्यावर गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यानंतर तिला मडगांव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच बुधवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात पती दोन मुलगे ,दीर ,भावजय व नात असा परिवार आहे. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सक्रीय सदस्य भगवान उर्फ दाजी रेडकर व महेंद्र रेडकर यांची ती आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!