अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग विद्यार्थी संघटनेच्या वतीने भविष्यातील करिअर एक्स्पो यासंदर्भात मार्गदर्शनप संपन्न
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग विद्यार्थी संघटनेच्या वतीने भविष्यातील करिअर एक्स्पो यासंदर्भात मार्गदर्शनप संपन्न
कुडाळ
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग विद्यार्थी संघटनेच्या वतीने लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग येथे मराठा विद्यार्थ्यांना मिळणारी शालेय शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता योजना तसेच EWS चे लाभ आणि भविष्यातील करिअर एक्स्पो यासंदर्भात मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार अनुपसेन अमरसेन सावंत यांनी विद्यार्थ्यांना मराठा समाजासाठी मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच निर्वाहभत्ता योजनेची माहिती दिली आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी जास्तीत जास्त मराठा विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात.
तसेच महाडीबीटी पोर्टल ला येणाऱ्या तांत्रिक समस्या आणि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याबाबत ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी संघटनेमार्फत प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मराठा महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने येथे देण्यात आले. यावेळी हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आभार मानले

