कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्ह्यात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनासोबत घेऊन काम करा-राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

*जिल्ह्यात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनासोबत घेऊन काम करा-राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी*
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आहे. आतापर्यंत या जिल्ह्यात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत घेऊन काम करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य प्रवक्ते श्री. गोपाळदादा तिवारी यांनी सावंतवाडीत केले
त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या प्रांगणात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते
पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष ईर्शाद शेख ज्येष्ठ कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास भाई सावंत
महिला पदाधिकारी विभावरी सुकी, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हापसेकर चंद्रकांत राणे संदीप सुकी सुधीर मल्हार आनंद परुळेकर तौकीर शेख जस्मिन लंकेश्वर ,चंद्रकांत राणे मनोहर वेर्गुलेकर बाळा नमशी बबन डिसोजा आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!