दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ सोडवा..
▪️सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०३: दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत यापूर्वी दोन वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी व्यक्त केली आहे.
तळागाळातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, कोरोना काळात संजय गांधी निराधार योजनेचे मानधन देण्यात यावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले अतिरिक्त मानधनही देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात अस्थिव्यंग तज्ञ नसल्याने दिव्यांग बांधवांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी विलंब लागत आहे. यामुळे अस्थिव्यंग तज्ञ नियुक्त करण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा मिळणारे एक हजार रुपये मानधन वेळेत देण्यात यावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले अतिरिक्त मानधन अद्याप मिळालेले नाही, ते वेळेत मिळावे. समाजकल्याण योजनांसाठी जास्तीत जास्त पन्नास वर्षे वयाची असलेली अट दहा वर्षांनी वाढवून ६० वर्षे करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी कसाल येथील साई सिंधुदुर्ग साईकृपा शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, शेखर आळवे, बाबुराव गावडे, प्रशांत कदम, गुरुनाथ सामंत, समीर नाईक, अरविंद आळवे आदी उपस्थित होते.
सदर विविध मागण्यांचे निवेदन टपालाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवण्यात येणार असल्याचे दिव्यांग बांधवांनी सांगितले.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

