स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पाडलोस येथे गाव वॉटस अप ग्रुप तर्फे तालुकास्तरीय भजन स्पर्धा
विजेत्या भजन मंडळाना तसेच गायक व वादक यांना आकर्षक बक्षिसे
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे वॉटसअप ग्रुप तर्फे सावंतवाडी तालुकामर्यादित व तालुकास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 5 हजार 1 व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 3 हजार 1 व सन्मानचिन्ह तर तृतीय पारितोषिक रोख रुपये 2 हजार 1 व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये 1 हजार 1 व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट गायक 501 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट तबलावादक 501 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट हार्मोनियम वादक 501 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट झांजवादक 501 रुपये व सन्मानचिन्ह,उत्कृष्ट पखवाजवादक 501 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट कोरस 501 रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2022 राहिल व इच्छुक संघानी आपली नावे विश्राम गावडे 9067220505 यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे.