कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नीतिमत्ताच्या गोष्टी सांगणारे आमदार दीपक केसरकर यांचा जीव त्यांना मिळालेल्या खोक्यात अडकला आहे- डॉ जयेंद्र परुळेकर

*🟥नीतिमत्ताच्या गोष्टी सांगणारे आमदार दीपक केसरकर यांचा जीव त्यांना मिळालेल्या खोक्यात अडकला आहे- डॉ जयेंद्र परुळेकर*

*🟥 सत्तेच्या लालसे पोटी शिवसेनेशी गद्दारी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२७ जुलै*
नीतिमत्ताच्या गोष्टी सांगणारे आमदार दीपक केसरकर यांचा जीव त्यांना मिळालेल्या खोक्यात अडकला आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघातील चिंता नसून ते गायब झाले आहेत, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते: जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे लगावला. हिंदुत्वाच्या गोष्टी सांगणाऱ्या आमदार दीपक केसरकरांनी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपाशी हात मिळवणी केली. परंतु येथील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असे म्हणाले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, अमेय मोरे, प्रशांत कोठावळे शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, सिताराम राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. परुळेकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस हा गेल्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडी नंतर शिवसैनिकांसाठी एक प्रकारे उत्सव आहे, मुळात जे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून निघून गेले त्यांची येणाऱ्या काळात काय अवस्था असेल हे दिसून येईल कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपद हे मनावर दगड ठेवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे हे पद असेपर्यंत शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना किंमत असणार आहे त्यानंतर या आमदारांचा पालापाचोळा होईल.
श्री परुळेकर पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर जनतेचा विश्वासघात करून शिंदे गटात सामील झाले आणि शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ते आज हिंदुत्वाची भाषा करत शिवसेना पक्षप्रमुखावर टिका करत आहेत, त्यांना माझे तीन प्रश्न आहेत, ते म्हणजे ज्या सरकारच्या बाजुने केसरकर नीतिमत्तेच्या गोष्टी करत आहे ते सरकार येणाऱ्या अडीच वर्षात टिकेल का? राज्यात पूर परिस्थिती उद्भवली असताना एकीकडे शेतकरी हवालदिल आहेत मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करून दिल्ली वारी करत आहेत, आमदार केसरकर तुमचेही मतदार संघावर दुर्लक्ष झाल हीच तुमची नीतिमत्ता का ? आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून बंडखोरी केली त्यामुळे हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा. तर आमदार केसरकर यांना येथील जनतेचे सैर सुतक नसून ते केवळ मिळालेल्या खोक्यात अडकले आहेत त्यामुळे येत्या काळात त्यांनाच जनता मतदार संघातून गायब करणार असून ते यापुढे कदापी निवडून येणार नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿

_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_

*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*

*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*

_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*

*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!