.विधवा प्रथेसारख्या कु प्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार
*🟥.विधवा प्रथेसारख्या कु प्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार*
*🟥महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) या संस्थेअंतर्गत शारदा ग्राम संघ मळगांव बचत गटाचा निर्धार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:२७ जुलै*
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) या संस्थेअंतर्गत शारदा ग्राम संघ मळगांव, या महिला बचत गटाच्या महिलांनी विधवा प्रथेसारख्या कु प्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार केला आहे. या निर्धारा अंतर्गत या महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्रकाची आदर राखून तसा ठराव घेतला. हा ठराव नुकताच एका सभेत सर्वानुम मंजूर करुन एक नवा पायंडा पाडला आहे.
शारदा ग्राम संघ या संघाच्या मासिक सभे अंतर्गत एक बैठक घेण्यात आली. यावेळी माधवी मुकुंद राऊळ, अर्चना चंद्रकांत जाधव, ज्योती ग्राम संघाच्या सी.आर.पी. रत्नप्रभा रघुवीर नाईक (ब्राह्मण पाट), जीवन ग्राम संघाच्या सी.आर.पी. राघीणी राजाराम शिरोडकर (कुंभार्ली), शारदा ग्राम संघाच्या सी. आर. पी. विजया विजय गवंडे, ग्रामपंचायत सदस्या निकिता निलकंठ बुगडे आदी उपस्थित होते. या बैठकीत समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ठ विधवा प्रथेचे निर्मुलन करण्याचा विषय मांडण्यात आला होता. या विषयाला सर्व महिला सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. या पाठिंब्यानुसार आज २१ व्या शतकातही वावरताना समाज विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून वाटचाल करत असतानाही काही प्रथा रुजवत आहोत व वाढवत आहे. विशेषतः पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. तसेच यानंतर अशा महिलांना समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. पती निधनानंतर समाजात वावरताना त्या महिलेला प्रचंड अवहेलना सोसावी लागते. अशा विधवा महिलांना प्रतिष्ठीत जीवन जगण्याची मानवी अधिकार तसेच भारतीय संविधानानुसार बहाल करण्यात आलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन केले जाते.. अशा कुप्रथा शासनाच्या परीपत्रकाचा आदर राखून यापुढे न पाळण्याचा निर्णय या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. माधवी मुकुंद राऊळ यांनी सुचविलेल्या या ठरावाला अर्चना चंद्रकांत जाधव यांनी अनुमोदन दिले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

