पिसाळलेल्या कुत्र्यांची मोठी दहशत ; गोठोस मध्ये चार म्हैशी मृत्युमुखी तर मोरे येथे मेंढपाळ जखमी
*🟥 पिसाळलेल्या कुत्र्यांची मोठी दहशत ; गोठोस मध्ये चार म्हैशी मृत्युमुखी तर मोरे येथे मेंढपाळ जखमी*
*🟥 स्थानिक प्रशासनाने ‘त्या’ कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा ; भयभीत ग्रामस्थांची जोरदार मागणी*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२४-* पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे गोठोस गावामध्ये एका शेतकऱ्याच्या चार म्हैशींना जीव गमवावा लागला, त्यामुळे त्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे लगतच्या मोरे गावात एक धनगर समाजाचा शेतकरी जखमी झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत मार्फत त्वरित कार्यवाही होऊन पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील गोठोस येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पिसाळलेल्या मोकाट फीरणाऱ्या कुत्र्याने रात्रीच्या वेळी एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरुन चावा घेतल्याने चार म्हैशी दगावल्या आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे खुप नुकसान झाले आहे. तसेच गोठोस गावालगत असलेल्या मोरे येथे दुसऱ्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने रात्रीच्या सुमारास अंगणात बकऱ्यांच्या संरक्षणासाठी झोपलेल्या एका मेंढपाळाच्या कानाचा जावा घेऊन त्याला जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी परिसरातील इतर फिरणाऱ्या कुत्र्यांना इजा केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून गोठोस आणि मोरे गावातील भटक्या कुत्र्यांमध्ये पिसाळण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही गावातील नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना बाहेर फिरण्यास किंवा रस्त्यातून ये-जा करण्यास धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत गोठोस आणि मोरे गाव हद्दीत येणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वाडोस यांनी भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या सामाजिक संस्थांशी पत्र व्यवहार करावा आणि मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना जेरबंद करुन योग्य कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
*…………👇👇.सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…..👇👇*
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*

